पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

pathdukhi

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – गाडी चालवताना, बसमध्ये बसल्यावर तसेच सकाळी उठताना, कार्यालयात काम करताना अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखीचा हा त्रास कधीकधी असह्य होतो. कोणतेही काम करताना पाठीत दुखते. पाठदुखीची ही समस्या जाणवत असल्यास त्यामागील कारणे जाणून घेणे खूप आवश्यक असते. कधीकधी काही चूकीच्या सवयींमुळे पाठदुखीचा त्रास होत असतो. असे असेल तर प्रथम या सवयी सोडाव्या लागतील. अन्यथा, पाठदुखी तुम्हाला सतत त्रास देत राहिल.

पाठदुखीचा त्रास का होतो याचे कारण ओळखून आवश्यक ते उपाय करून या पीडेपासून मुक्तता मिळणे सहज शक्य आहे. रात्रीच्या वेळी आपण झोपेत असताना पाठीत अतिरिक्त गोळा होते. हा फ्लुइड डिस्कच्या आतमध्ये गळत राहतो. डिस्क ही एक स्पंजी कुशनसारखी असते, जी पाठीच्या कण्यामध्ये २४ सांध्यांना पृथक करते वा त्यांच्यामध्ये असते. अशी व्यक्ती सकाळी उठल्यानंतर झुकते तेव्हा त्या संग्रहित फ्लुइडमुळे पाठीच्या कण्यावर दबाव येऊ लागतो. परिणामी वेदना होतात. जे लोक सकाळी एकदम झुकत नाहीत, त्यांना वेदना कमी होतात. सकाळी पलंगावरून जमिनीवर पाय ठेवताना कंबर एकदम वा जास्त झुकणार नाही, याची काळजी घेतली तर पाठदुखीचा त्रास टाळता येतो. यासाठी ही खबरदारी घेतली पाहिजे.

दुसरी खबरदारी म्हणजे पाठ दुखत असल्यास बु्रफेनसारखी वेदनाशामक औषधे अजिबात घेऊ नाका. पाठदुखीने पीडित असलेले जे लोक नियमितरीत्या हीट रॅप्सचा म्हणजेच गरम पट्टीचा वापर करतात, त्यांच्या वेदना २५ टक्के कमी होतात. हीट रॅप्समुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि उतींची लवचीकता वाढते, असे न्यू जर्सी मेडिकल स्कूलच्या संशोधकांचे म्हणणे आहे. पाठदुखीचा त्रास असल्याने अनेकांना शारीरिक व्यायाम बंद ठेवावा लागतो. पाठदुखी बंद झाली नाही तर व्यायाम कधीच करता येणे शक्य नसते. मात्र, यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम करता येऊ शकतो. व्यायाम करताना वेदना झाल्यास घाबरू नका, कारण बरे होताना असे होणे हे सामान्य लक्षण आहे. पाठदुखीवर आणखी एक उपाय म्हणजे विश्रांती व सुगम संगीत होय. हे दोन उपाय केल्यास पाठदुखीपासून सुटका होऊ शकते. हा एक शांत उपचार आहे. जे लोक लागोपाठ तीन आठवडे दररोज २५ मिनिटे संगीत ऐकत होते, त्यांची पाठदुखी ४० टक्क्यांनी कमी झाली. संगीतामुळे वेदनेकडे पीडिताचे दुर्लक्ष होते असे एका ऑट्रेलियन संशोधनात आढळून आले आहे.