आरोग्यनामा ऑनलाईन- आयुर्वेदानुसार नवजात शिशुच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बाळांची मसाज(Baby Massage) करणे खूप महत्वाचे आहे. बाळांच्या स्नायू व्यायामामुळे(Baby Massage) बळकट होतात, शरीरात रक्ताभिसरण नियंत्रित राहते. बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतात. मालिश केल्याने बाळांचा थकवा दूर होतो. त्यांना झोप चांगली मिळते. यामुळे आई आणि मुलाचे नाते अधिक मजबूत होते.
नवजात बाळाच्या मालीशसाठी तेल आणि तूप वापरले जाते. बाळाच्या डोक्यावर मालिश करण्यासाठी तूप वापरणे चांगले आणि शरीरावर मालिश करण्यासाठी तेल. मसाज करण्यासाठी खाण्याचे तेल वापरले जाऊ शकते. याशिवाय मुलांच्या मालिशसाठी बनविलेले विशेष आयुर्वेदिक तेलही वापरता येईल. एक दिवसापासून ते ३ वर्षाच्या वयापर्यंत मालिश करणे गरजेचं आहे. नियमित केले तरीही चालू शकते.
मालिश दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा
१) भुकेलेल्या पोटाने बाळाची मालिश करा. नाहीतर मालिश केल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो.
२)मालिश दरम्यान आणि एक तासानंतर बाळाला थंड हवेपासून दूर ठेवा.
३)मसाजमध्ये सुगंधित तेल वापरणे टाळा. नारळ, ऑलिव्ह, तीळ तेलासारख्या खाद्य तेलांद्वारे मालिश करता येते. मोहरीच्या तेलानेही मालिश करता येते. परंतु जर त्यामुळं आपल्याला जळजळ होत असेल तर इतर तेल वापरा.
४)नेहमीच डोक्यावर घरच्या तुपानं मालिश करा.
५)ताप, उलट्या, अतिसार आणि बाळाची अस्वस्थता वाटत असल्यास मालिश करू नका.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.