आरोग्यनामा ऑनलाईन टीम- लहान मुलं एकदा खेळायला लागली की त्यांना माती आणि खडू खायची सवय लागते. आपलं लक्ष गेलं की आपण त्यांना ते खाऊ देत नाही. पण आपल लक्ष जाऊ पर्यंत त्यांनी काही प्रमाणात खाल्लेला खडू किंवा मातीमुळे त्यांच्या पोटात जंतू तयार होतात. जंतूमुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.
१) लहान मुलांची माती आणि खडू खाण्याची सवय मोडायची असेल तर त्यांना केळ आणि मध मिळून खायला द्या.
२) लहान मुलांना कायम कामात व्यस्त ठेवा. त्यामुळे त्यांना खडू आणि माती खायला वेळ मिळणार नाही.
३) लहान मुलांची डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. शरीरात कोणत्या पोषण द्रव्याची काही कमी तर नाही ना हे तपासून पाहावं.
४) लहान मुलांना संपूर्ण पोषण आहार द्यावा. जेणेकरून त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता राहत नाही.
५) तुमच्या मुलाची माती आणि खडू खाण्याची सवय मोडण्यासाठी त्यांना रोज रात्री कोमट पाण्यासोबत ओवा खायला द्या.