आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रानावनात राहणारे आदिवासी बांधव विविध रोगांवर नैसर्गिक उपाय करून आजार बरे करतात. हीच झाडे शहरी भागातदेखील मुबलक प्रमाणात असतात. परंतु, त्याबाबत सखोल माहिती नसल्याने आपण उपचार करू शकत नाही. अतिशय रामबाण उपाय असलेली अनेक झाडे आपल्या परिसरात असूनही आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. पूर्वी घरातील ज्येष्ठ व्यक्तींना ही झाडे ओळखता येत असत. परंतु, आता काळाच्या ओघात माणसाचे निसर्गाकडे खूपच दुर्लक्ष झाले आहे. विविध आजारांवर गुणकारी असलेल्या अशाच काही झाडांची माहिती आपण घेणार आहोत.
बांबू
बांबूच्या झाडांच्या पानांचा काढा तयार करून पिल्यास स्त्रियांची थांबलेली मासिक पाळी पुन्हा सुरु होते. मधासोबत बांबूच्या पानांचा रस घेतल्यास खोकला बारा होतो, असे आदिवासी बांधव सांगतात.
मोहाचे झाड
मोहाच्या झाडाच्या सालीपासून तयार केलेला ५० मि.ली. काढा दररोज पिल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूरू होतात. या काढ्याने शरीरातील गाठींवर आदिवासी बांधव आजही उपचार करतात. मोहाच्या सालीचे चूर्ण तूप किंवा लोण्यासोबत खाल्ल्यास वीर्य वृद्धी होते.
शिसम
शिसम झाडाच्या पानांपासून तयार केलेले तेल जखमेवर लावले जाते. यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. शिसम झाडाची कवळी आणि हिरवी पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत. सकाळी ही पाने वाळवून घ्यावीत. बारीक खडीसाखरेसोबत या पानांचे सेवन केल्यास विर्याशी संबंधित आजार बरे होतात.
शाल्मली
१) कंबरदुखी, सांधेदुखीचा आजार दूर करण्यासाठी शाल्मली झाडाची पाने, अद्रक आणि कापूर समान मात्रेत घेऊन बारीक करून याचा लेप तयार करावा. हा लेप कंबरेवर आणि सांध्यांवर लावावा.
२) जुलाब होत असतील तर शाल्मली झाडाच्या सालीचे ५-१० ग्रॅम चूर्ण साखरेसोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.
३) शाल्मलीच्या मुळांपासून तयार केलेले चूर्ण दिवसातून ३ वेळेस घेतल्यास संधिवातामध्ये आराम मिळतो. शाल्मली हा एक पानझडी वृक्ष आहे. हा वृक्ष सैबा प्रजातीमधील आहे. याच्या दहा जाती असून त्यांपैकी भारतात फक्त एकच जाती आढळते. भारतात गुजरात, खानदेश, पुणे, कोकणसह बहुतेक उष्ण भागांत हे झाड आढळते. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा हे झाड आढळते.