आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणा हा महिलांसाठी खुप महत्त्वाचा काळ असतो. गरोदरपणा हा नवमातेसाठी खुप आव्हानात्मक काळ असतो. तसेच महिलांसाठी हा आनंदाचा काळही असतो. परंतु, कधीकधी हा आनंद अचानक झालेल्या मिसकॅरेजमुळे दु:खात बदलू शकतो. हे दु:ख पचविणे त्या स्त्रीसाठी कठीण असते. मिसकॅरेज हा एक अपघात असतो त्यामुळे पुढील जीवनावर काहीही परिणाम होत नाही. आकस्मित गर्भपात टाळण्यासाठी काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
अशी घ्या काळजी
* तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही जास्त धावपळ करु नका. घरुन काम करण्याचा पर्याय असेल तर तो निवडा. यामुळे कामाचा ताण कमी होईल.
* गर्भधारणे दरम्यान स्त्रीची मानसिक स्थिती चांगली असण्यासाठी स्त्रीच्या शरीरातील पित्तप्रकृती देखील उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी बाळासाठी प्रयत्न करीत असाल तर वेळेवर झोपा व श्वासाचे व्यायाम, मेडीटेशन करा ज्यामुळे तुम्ही आनंदी रहाल.
* यशस्वी गर्भधारणेसाठी चांगल्या व पोषक सतुंलित आहार घ्यावा. यासोतबच या महिलांनी सात्विक आहार घेणे खुप गरजेचे आहे. सात्विक आहार म्हणजे फक्त शाकाहारी आहार नाही. जो आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी,आनंददायी वाटते व पोटाला आराम मिळतो असा आहार घ्या.
* वेळेवर झोपता का व तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते का याकडे नीट लक्ष द्या. त्याचप्रमाणे या स्त्रीने तीच्या पोटाच्या समस्यांकडे देखील वेळेवर लक्ष द्यावे.
* काही हलके व्यायाम करा. यासाठी ४५ मिनीटे चालणे, ५ ते १० मिनीटे योगासने करणे असे व्यायाम तुम्ही नक्कीच करु शकता. यामुळे तुमच्या शरीरात लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील.