भोपळ्याचा ज्यूस घ्या
* भोपळा सर्वात जास्त आम्लधर्मी आहे. दररोज भोपळ्याचे एक ग्लास ज्यूस घ्यावे किंवा कच्चा भोपळा खावा. दररोज २०० ते ३०० मिलि घ्यावे. हा ज्यूस सकाळी शौच करून आल्यानंतर प्यावा. यावेळी पोट एकदम रिकामे असते. किंवा नाष्टा केल्यानंतर अर्ध्या तासाने घ्यावा.
ही काळजी घ्या
ज्यूस करण्यापूर्वी भोपळा कापून त्याची चव घ्यावी. जर चव कडू असेल तर त्या भोपळ्याचा ज्यूस घेऊ नये. या व्यतिरिक्त भोपळ्याचे ज्यूस इतर कोणत्याही ज्यूससोबत घेऊ नये.
अर्जुन वृक्षाची साल
अर्जुन वृक्षाची साल कुठेही सहजपणे मिळते. २ चमचे अर्जुन वृक्षाच्या सालीचे चूर्ण १ ग्लास पाण्यामध्ये पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड करून दिवसातून दोन वेळेस घ्या. हे पाणी रिकाम्या पोटी घ्यावे. भोपळ्याचे ज्यूस किंवा अर्जुन वृक्षाची साल यांचा उपयोग २-३ महिने करावा. यांचे सेवन केल्यानंतर काही दिवसातच फरक दिसून येईल.