आरोग्यनामा ऑनलाईन- ताण, चुकीचे खाणे, चुकीच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केस लहान वयातच पांढरे होतात. अनेक जण केसांना रंग लावतात. परंतु त्यात हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत घरीच आयुर्वेदिक(Ayurvedic ) हेअर ऑईल बनवून या समस्येवर मात करू शकता. यामुळे पांढर्या केसांपासूनही मुक्तता(Ayurvedic ) होईल. केस लांब, जाड होतील.
जास्वंद तेल
जास्वंदाची 10-12 फुले सूर्यप्रकाशात वाळवा. नंतर 250 ग्रॅम मोहरी तेल, 100 ग्रॅम एरंडेल तेल, 2 चमचे बडीशेप तेल घाला. 30 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे आणि नंतर ते थंड होऊ द्या. आता तेल गाळून बाटलीत घाला.
कसे वापरायचे
रात्री झोपेच्या आधी 20 मिनिटे तेलाने केसांच्या मुळांना मालिश करा. मालिशानंतर 1 तासासाठी केस विंचरू नका. सकाळी सौम्य शैम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. नियमितपणे वापरुन फरक जाणवेल.
शिकाकाई तेल
50 ग्रॅम शिकाकाई, 2 चमचे कालोनजी पावडर, 20-25 कढीपत्ता पाने, एरंडेल तेल हे 15 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तेल शिजल्यानंतर ते थंड करून बाटलीत घाला.
कसे वापरायचे
या तेलाने डोक्यावर 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी ताजे पाणी आणि सौम्य शैम्पूने केस धुवा. केस धुल्यानंतर कंडिशनर करा. नियमितपणे हे केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतील.
केस काळे करण्यासाठी इतर टिप्स
1. आवळा रस आणि बदाम तेल मिसळून केसांची मालिश करा.
2.चहाच्या पानांनी धुतल्यास केस काळे होतील.
3. पोषक तत्वांचा अभाव देखील पांढर्या केसांना कारणीभूत आहे. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, आवळा, कडीपत्ता, मासे, कोंबडी, सोयाबीन, चीज, इत्यादी घेत रहा.
4. मेथीच्या पाण्याने केस धुवा किंवा पेस्ट लावा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.