आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात उल्लेख असलेले आणि पूर्वी अनेकांच्या खाण्यात असलेले भोकर हे फळ आता दिसेनासे झाले आहे. भोकराचे झाड मोठे असते. या झाडाला येणारे सुपारीच्या आकाराचे फळ इंडियन चेरी म्हणूनही ओळखले जाते. कच्च्या भोकराची भाजी तसेच लोणचेही केले जाते. पिकलेले भोकर चवीला गोड असते. भोकर फोडल्यानंतर आतून गोड चव असलेला घट्ट चिकट द्रव बाहेर येतो. या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
भोकराच्या झाडाची साल उकळून त्याचा काढा नियमित घेतल्याने गळ्याचे सर्व आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची पाने वाटून त्याचा रस पिल्याने अतिसार तसेच कावीळ सारखे आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची साल पाण्यात उकळून घ्यावी. पाणी कोमट झाल्यानंतर गुळण्या कराव्या. यामुळे दांत आणि हिरड्यांचे आजार बरे होतात. भोकराच्या झाडांच्या पानांचा रस अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. भोकराच्या सालीचा काढा प्यायल्याने महिलांच्या मासिक पाळीच्याही समस्या दूर होतात.
भोकराच्या झाडाचे लाकुडही मजबूत असते. भोकर हे शक्तीवर्धक फळ असून आदिवासी जमाती मोठ्याप्रमाणात त्याचे सेवन करतात. अनेक आजारांवरही भोकर गुणकारी आहे. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृत श्लेष्मातक, बहुवारक, इंग्रजीत इंडियन चेरी असे म्हणतात. गुजरातमधील आदिवासी हे भोकर सुकवून त्याचे चूर्ण तयार करतात. मैदा, बेसन आणि तूपात मिसळून त्याचे लाडू केले जातात. हे लाडू सेवन केल्याने शरीर सशक्त होते. आणि स्फूर्तीही मिळते.
भोकराच्या झाडाची सुकलेली साल आणि कापूर यांचे मिश्रण करून सुजलेल्या भागावर मालिश केल्याने सूज कमी होते. भोकरच्या झाडाची साल पाण्यात उकळावी. या पाण्याने गुळण्या केल्याने गळ्याचे आजार बरे होतात. भोकराच्या बिया बारीक करून गजकरण झालेल्या जागेवर लावल्याने त्वरीत आराम मिळतो.
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे
पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले
कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा