आयुर्वेदिक औषधे घेण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, अन्यथा लाभ होणार नाही

Ayurvedic
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अत्यंत सुरक्षित उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदाकडे पाहिले जाते. आयुर्वेदिक औषधांचा साइड इफेक्ट होत नाही. यामुळे आयुर्वेदाचे महत्व आजही अबाधित आहे. साइड इफेक्ट होत नसल्याने अनेकजण आयुर्वेदिक औषधांचे बिनधास्त सेवन करतात. छोट्या-छोट्या आजारांवर आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे आजही लोकांचा कल आहे. ही उपचार पद्धती सुरक्षित असली आणि औषधांचा साइड इफेक्ट होत नसला तरी आयुर्वेदिक औषधे घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते, अन्यथा त्यांचा प्रभाव जाणवणार नाही. शिवाय, यामुळे आजार सुद्धा बळावू शकतो.

अशी घ्या काळजी

आयुर्वेदिक औषध कोमट पाण्यातूनच घ्यावे. लवकर प्रभाव पडतो.

आयुर्वेदिक औषध दुधासोबत घ्यायचे असल्यास गाईच्या दुधासोबतच घ्यावे.

भस्म मध अथवा तुपासोबत घ्यावे.

आयुर्वेदिक औषधांचीही एक्सपायरी डेट असते, त्यामुळे तारीख पाहुनच औषध घ्यावे.

काढा अथवा जडीबुटी चटणीचा बारा तासाच्या आत वापर करा. अन्यथा त्यास बुरशी लागू शकते.

आयुर्वेदिक औषधे घेत असताना तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ सेवन करू नका.

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच औषधे घ्यावीत अन्यथा प्रभाव पडणार नाही.

काढ्या व्यतिरिक्त कोणतेही आयुर्वेदिक औषध जेवल्यानंतरच घ्यावे. अन्यथा पोटात त्रास होऊ शकतो.

कोणतेही उघडलेले अथवा झाकण सैल असलेले औषध घेवू नये.

१० आयुर्वेदिक औषध तुपासोबत घ्यायचे असल्यास गाईच्या तुपाचा वापर करावा.