पोटाचा अल्सर बरा करण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील उष्णतेमुळे आणि उष्णता वाढवणारे पदार्थ खाल्यामुळे अनेकांना अल्सर या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारामुळे अनेकांना काही खाता पिता येत नाही आणि शरीरात खूप फोड आल्यामुळे त्याच्या वेदनाही खूप असह्य असतात. याच्या उपचारास जर उशीर झाला तर हे अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या गंभीर रोगाचे रूप घेऊ शकते. त्यामुळे आपण हा आजार बरा करण्यासाठी काय उपाय करू शकतो. हे आज जाणून घेणार आहोत.

पोटाच्या जखमा बऱ्या होण्यासाठी मुलेठी चूर्णाचा उपयोग करा. पोटाच्या अल्सरसाठी हे पिणे फायदेशीर ठरते. हे केवळ गॅस्ट्रिक अल्सरच नाही तर अल्सरचा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागास देखील फायदा करते. तसेच हे ऍसिडिटी सारख्या आजारासाठीही फायदेशीर आहे.

मुलेठी हे आयुर्वेदिक औषध आहे. याचे चूर्ण पिल्यानंतर तुमचे खोकल्यासारखे आजारही बरे होतात.  तसेच हे चूर्ण गॅस्ट्रिक अल्सरसाठी देखील फायदेशीर आहे. त्याची वनस्पती १ ते ६ फूट आहे. ते चवीला गोड आहे, म्हणून याला यष्टिमधु देखील म्हणतात.

वापरण्याची पद्धत :

मुलेठीचे झाड मुळापासून उपटून टाकल्यानंतर त्याचे गुणधर्म २ वर्षांसाठी राहतात. मुलेठी हे फार पूर्वी औषधाच्या रूपात वापरले गेले आहे. यामुळे गलगंड, पोटातील रोग, श्वसन रोग, स्तनाचे रोग, योनीतून होणारे रोग कमी होतात. ताज्या मुलेठीमध्ये  ५० टक्के पाणी असते. यामध्ये असणाऱ्या ग्लिसरिक ऍसिडमुळे त्याची चव सामान्य साखरेपेक्षा ५० टक्के जास्त गोड असते.