आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी आयुर्वेदात अनेक पद्धती सांगितल्या आहेत. यापैकी एक आहे दालचिनी चहा. हा चहा कसा बनवावा आणि याच्या सेवनाचे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…
दालचिनी चहाची कृती –
एका भांड्यात पाण्यासह थोडी दालचिनी चांगली उकळवून घ्या. दालचिनी चांगली उकळल्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या. यामध्ये थोडे आले सुद्धा टाकू शकता. आवाडीनुसार मध किंवा लिंबू रस मिसळून पिऊ शकता.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या
दालचिनी चहा पिण्याचे फायदे –
– वजन घटते. शरीरचे मेटाबॉलिज्म वाढते. फॅट वेगाने बर्न होते.
– यातील पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडेंट्स तत्वामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते, हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.
– इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल होते.
– पीरियड्स दरम्यान होणार्या वेदना आणि क्रॅम्प्सची समस्या दूर होऊ शकते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
6 तासांपेक्षा कमी झोपणार्यांना होऊ शकतो मानसिक आजार, 35 वर्षांच्या रिसर्चनंतर शास्त्रज्ञांनी केला खुलासा
सतत गोड खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी ‘या’ 4 ‘टिप्स’ अँड ‘ट्रिक्स’ची घ्या मदत, जाणून घ्या
कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)