आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पोषक तत्वांची कमतरता, हार्मोन्स योग्य प्रकारे विकसित न होणे, यामुळे काही व्यक्तींची उंची वाढत नाही. ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे एचजीएचवर उंचीची वाढ निर्भर असते. एचजीएच पिट्युटरी ग्लँडमधून निघते. योग्य प्रोटीन आणि न्युट्रिशन न मिळाल्यास शरीराची वाढ खुंटते. अशी समस्या असल्यास उंची वाढवण्याचे हे उपाय करावेत.
उपाय १
अश्वगंधा चुर्णाचे सेवन केल्याने उंची वाढण्यास मदत होते. अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्यावे. या चूर्णामध्ये समान मात्रेत साखर मिसळावी. अशा पद्धतीने सेवन करावे. हे २ चमचे मिश्रण एक ग्लास दुधात टाकून प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी ४५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास शरीर पिळदार बनते तसेच उंची वाढते. यासाठी पथ्य पाळावे. फास्ट फूड किंवा जंक फूड खाऊ नये. जास्त तिखट, मसाला असलेले पदार्थ खाऊ नये.
उपाय २
ताडासन हे आसन केल्यास उंची वाढते. हे आसन करण्यास अतिशय सोपे आहे. सरळ दोन्ही पायांवर सारखा भार टाकून उभे राहावे. पाय जुळालेले ठेवावे. शरीर स्थिर असू द्यावे. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेने न्यावेत. श्वास घेत हात वरच्या दिशेने खेचावेत. चवड्यांवर उभे राहावे. शरीराचे संतुलन साधाावे. या स्थितीत काही काळ थांबावे. श्वास कोठेही रोखून धरू नये. हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीत यावे. हे आसन अभ्यासाने अधिक काळापर्यंत करता येते. सुरुवातील अर्धा मिनिटापर्यंत कराावे. या आसनाची ५/१० आवर्तने करता येतात.
उपाय ३
भुजंगासन सुद्धा उंची वाढविण्यासाठी उपयोगी आहे. हे करण्यासाठी जमिनीवर पोटावर पालथे झोपा. दोन्ही पाय आणि पंजे परस्पर जुळलेले असावेत. पायाचे अंगठे मागील बाजूस खेचावेत. दोन्ही हात डोक्याकडे लांब करावे. पायाचे अंगठे, बेंबी, छाती, कपाळ आणि हातांचे तळवे जमिनीवर एकाच रेषेत असावेत. आता दोन्ही हात कंबरेजवळ घेऊन जा. डोके आणि कंबर वर उचलून शक्य होईल तेवढे मागील बाजूस वळवा. बेंबी जमिनीस टेकवा. संपूर्ण शरीराचे वजन हाताच्या पंजावर येईल. शरीराची स्थिती कमानी सारखी होईल. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकावर दबाव केंद्रित राहील. चित्तवृत्ती कंठात आणि दुष्टी आकाशाकडे स्थिर करावी. २० सेकंद हीच स्थिती ठेवा. नंतर डोके हळूहळू खाली घेऊन या. छाती जमिनीला टेकवा. नंतर डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. दररोज ८ ते १० वेळा हे आसन करावे.
उपाय ४
अश्वगंधा आणि सुकलेली नागोरी या दोन्ही वनस्पतींना आयुर्वेदामध्ये शरीराच्या विकासासाठी गुणकारी आहे. हा उपाय करण्यासाठी सुकलेली नागोरी आणि अश्वगंधाचे मूळ बारीक करून घ्या. या चूर्णामध्ये समान मात्रेत साखर मिसळा. हे मिश्रण काचेच्या बाटलीत ठेवा. रात्री झोपताना दररोज दोन चमचे हे चूर्ण घ्या. त्यानंतर गाईचे दुध प्या. यामुळे उंची वाढेल तसेच तब्येत सुधारते.
उपाय ५
काळे तीळ आणि अश्वगंधा चूर्णचे हे मिश्रण नियमित खाल्ल्यास उंची वाढते. १ ते २ ग्रॅम अश्वगंधा आणि १ ते २ ग्रॅम काळे तीळ बारीक करून चूर्ण तयार करा.
अशा पद्धतीने सेवन करा – हे चूर्ण ३ ते ५ खारकामध्ये मिसळून ५ ते २० ग्रॅम गाईच्या तुपासोबत एक महिनाभर खाल्ल्यास उंचीत वाढ होते.