आरोग्यनामा ऑनलाईन – चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव यामुळे तरूणपणात अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा व्यक्तींना विविध आजार होऊ शकतात. थकवा, सांधेदुखी, केस अकाली पांढरे होणे, अशक्तपणा, दृष्टीदोष अशा समस्या होऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय असून ते केल्यास निरोगी राहणे सहज शक्य आहे. चिरतरूण राहण्यासाठी असलेले आयुर्वेदिक उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
हे मिश्रण नियमित घ्या
१ आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व बारीक खडीसाखर प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.
संतुलित आहार
संतुलित आहार घ्यावा. तो पचण्यास हलका असावा. यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्व असावेत. बाहेरचे खाद्य, तेल, तुप, आणि गोड पदार्थ खाऊ नका. दररोज डाळिंबाचे सेवन करा. यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही. तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकते.
तणाव टाळा
मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत वेळ घालवा. संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचा, यामुळे मानसिक ताण दूर होईल.
हे लक्षात ठेवा
* दररोज झोपे वेळेवर घ्या. झोप कमी होण्याने अनेक आजार होतात. दररोज कमीत कमी ६ ते ८ घंटे झोपणे आवश्यक आहे.
* सकाळी लवकर उठायला हवे आणि रात्री योग्य वेळी झोपयला हवे.
* दिवसा अथवा संध्याकाळी झोपू नका.
* दररोज सकाळी व्यायाम करा. योगासनामुळे अधिक काळ तरूण राहता येते.
- आरोग्यविषयक वृत्त –
- त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
- रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्हाल आश्चर्यचकित
- सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
- कानाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
- मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
- मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
- ‘हा’ फोटो पाहून अस्वस्थ झालात का ? तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार
- ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान