आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा ही समस्या सध्या अनेकांना सतावते आहे. लठ्ठपणा दूर करण्यासाठी व्यायाम, डाएट असे प्रयत्नही अनेकजण करत असतात. मात्र, वजन वाढण्याची प्रक्रिया थांबत नाही. यामुळे विविध आजार होण्याचा धोकाही वाढत जातो. लठ्ठपणा सोबत पोटाचा घेर वाढल्यानेही काहीजण त्रस्त असतात. ही चरबी कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहाराशिवाय काही खास पेये घेतल्यास वजन कमी होऊ शकते. या पैकी एक पेय रोज सकाळी चहाऐवजी प्यावे. यामुळे पोटात जमा झालेले फॅट बर्न होते.
हे आहेत उपाय
भोपळा
साल काढून भोपळा कापून घ्या. त्यात पाणी टाकून मिक्सरमधून काढा. आता गाळून सेवन करा. यामुळे पोटावर साचलेली चरबी कमी होते.
लिंबू-पाणी
एक ग्लास पाण्यात लिंबू पिळा. चाळणीतून गाळून घ्या आणि मीठ टाकून सेवन करा. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि चरबी कमी होते.
कोरफडीचा रस
एक ग्लास पाण्यात कोरफडीचा गर मिसळून मिक्सरमधून काढा. नंतर गाळून त्याचे सेवन करा. यामुळे फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो.
आवळ्याचा रस
आवळ्याचे तुकडे करा. पाणी टाकून मिक्सरमधून काढा. गाळून घ्या आणि त्यात मीठ टाका. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात. पोटावरील चरबीदेखील कमी होते.
टोमॅटोचा रस
टोमॅटो कापून मिक्सरमधून काढून घ्या. चाळणीतून गाळून त्यात मीठ व काळे मिरे टाकून सेवन करा. यामुळे शरीर डिटॉक्स होते. फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने होते.