झीका व्हायरसबाबत ‘हे’ माहित आहे का ? उपाय नाहीच, अशी घ्या काळजी
झीका व्हायरचा इतिहास
१९४० मध्ये झीका व्हायरस सगळ्यात आधी युगांडामध्ये आढळला होता. त्यानंतर तो खूप वेगाने पसरत अफ्रिकेपर्यंत पोहोचला. तेथे या व्हायरसने अनेक बळी घेतले. नंतर तो दक्षिण प्रशांत महासागर आणि आशियाच्या काही देशामधून लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहोचला. ब्राझीलमध्ये याने थैमान घातल्यानंतर काही शास्त्रज्ञांनी अंदाजा लावला की, २०१४ च्या फुटबॉल वल्र्ड कपदरम्यान आशिया आणि दक्षिण प्रशांतकडून हा आला असावा.
ही आहेत लक्षणे
* हा व्हायरस एंडीज इजिप्टी नावाच्या डासांमुळे पसरतो. हे तेच डास आहेत, ज्यांच्यामुळे कावीळ, डेंगू आणि चिकुनगुनियासारखे विषाणुजन्य आजर होतात.
* झीका संक्रमित आईकडून आपल्या नवजात बाळात जातो. हा व्हायरस ब्लड आणि यौन संबंधामधूनही पसरतो.
* झीकाचे नेमके लक्षण अद्याप समोर न आल्याने याला ओळखणे थोडे अवघड असते. हा डास चावल्यानंतर, ताप रैशेज, डोकेदुखी आणि सांधेदुखी होते.
हे परिणाम होतात
यामुळे मायक्रोसेफली नावाचा आजार होतो. माइक्रोसेफली एक न्यूरोलॉजिकल समस्या असून याने मुलांचे डोके लहान राहते आणि मेंदूचा विकास होत नाही. यामुळे जीवालाही धोका निर्माण होतो. यातून वाचलेल्या मुलांना आयुष्यभर मेंदूसंबंधी विकार होतात.
अशी घ्या काळजी
झीका व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी अद्याप कोणताही उपाय शोधला गेला नाही. यातून वाचण्याचा एकमात्र उपाय म्हणजे काळजी घेणे. डासांना घरात येऊ देऊ नका, लांब बाह्यांचे कपडे वापरा.
Comments are closed.