आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विविध पदार्थांची चव वाढविण्यासाठी स्वयंपाक करताना लसणाचा वापर केला जातो. शिवाय लसणामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने औषध म्हणूनदेखील लसणाचा वापर केला जातो. अशाप्रकारे लसुण बहुगुणी असला तरी काही आजारांमध्ये त्याचा वापर करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. लसुण गरम आणि कोरडे असते. शिवाय, लसणाने रक्त पातळ होते. यामुळे काही आजारांमध्ये याच्या सेवनाने नुकसान होऊ शकते. हे आजार कोणते ते जाणून घेवूयात.
यांनी खाऊ नये
१ एनिमिया असेल तर
२ गर्भनिरोगध गोळ्या घेत असल्यास
३ लिव्हर प्रॉब्लेम असल्यास
४ गरोदर असल्यास
५ होमियोपॅथिक औषधे सुरू असल्यास
६ सर्जरी होणार असल्यास
७ अॅलर्जी असेल तर
८ रक्त पातळ करणारे औषध घेत असल्यस
९ लो ब्लड प्रेशर असेल तर
१० पोटाच्या समस्या असल्यास