काळजी घ्या ! फास्टफूड ठरू शकते तुमच्या शरीरासाठी अपायकारक

fast-food
June 26, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान असो की मोठा प्रत्येकाला फास्टफूड चटक लागली असल्याचे दिसून येते. चविष्ट आणि तिखट चवीच्या या पदार्थांचे सेवन लवकर थांबवले नाही तर विविध आजारांनी शरीराला उपाय होऊ शकतो. दिनचर्येत नियमित फास्टफूडचा वापर होत असल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतात. यासाठी फास्टफूड खाणे टाळले पाहिजे. तरुणाईला फास्टफूड जास्त आवडते. हेच रोजचे खाणे असल्याने त्यांना विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात.

अनेक फास्टफूड पदार्थ हे तिखट आणि अतितेलकट असल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते. यामुळे अ‍ॅसिडीटीसारखा त्रास जास्त वाढतो. शिवाय यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते .फास्टफूडचे पदार्थ तेलकट आणि तिखट असतात. ते नियमित वापराने अ‍ॅसिडीटी होऊ शकते. उन्हाळ्यात फास्टफूड खाल्याने तहान जास्त लागते. यामध्ये नियमित वापराने शरीरात पाण्याची कमतरता येण्याची शक्यता निर्माण होते. शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन सुद्धा होते.

हलके जेवण घ्या – उन्हाळ्यात आपली सवय बदलायलाच हवी. फास्टफूड ऐवजी हलक्या आणि घरगुती साध्या जेवणाला प्राधान्य द्यायला हवे. यामध्येच लिक्विड आणि शक्तिवर्धक पेय घेणे आवश्यक असल्याने याचे सेवन जरूर करावे. तरुण पिढीचे सगळ्यात जास्त आवडते – पिझ्झा, बर्गर आणि नुडल्ससारखे फास्टफूडची सवय सगळ्यात जास्त तरुण पिढीत आहे. याचे जास्त सेवन केल्यास तरुणांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागणार आहे. अती झाल्यास तब्बेतीवर याचा परिणाम होतो. मात्र, तरुणाईला घरगुती जेवणापेक्षा बाहेरील जेवण जास्त आवडते आणि त्यात प्रथम पसंती ही फास्टफूडलाच असते.