आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नॉनव्हेजचं नाव काढलं की लगेच काहींच्या तोंडाला पाणी सुटायला लागतं. सध्या तर आषाढ महिनाही सुरु आहे. अनेकजण चिकन-मटणावर ताव मारत असतील. त्यात रविवार असेल तर हमखास मटणाचा प्लॅन केला जातो. तुम्हाला माहिती आहे का, मटण खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे आरोग्यास अत्यंत घातक असते. त्यामुळे ते पदार्थ टाळणे तुमच्यासाठी चांगले आहे. याच पदार्थांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
1) मध- मधामध्ये जे घटक असतात त्याचा परिणाम थेट हृदय किंवा किडनीवर होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन टाळणे गरजेचे आहे.
2) दूध- दूध किंवा दुधाचे पदार्थ मटण खाल्ल्यानंतर अजिबात खायला नकोत. कारण तुम्हाला माहिती नसेल परंतु दुधात अॅंटी बायोटिक पदार्थ असतात. यामुळे याचा शरीरावर थेट परिणाम होऊन कोड फुटण्यासारखे रोग होऊ शकतात. दुधाला उत्तम पर्याय कोणता असेल तर तो दही आहे.
3) चहा- चहाचे सेवन केल्याने गॅस आणि अॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर चहाचे सेवन टाळणे गरजेचे आहे.
4) सिगारेट- तुम्ही मटण खाल्ल्यानंतर धुम्रपान केलं काय आणि खाण्याआधी केलं काय धुम्रपान तर तसंही आरोग्याला घातकच आहे. त्यामुळे धुम्रपान करणे टाळायला हवे. जेवणानंतर लगेच धु्म्रपान केल्याने आरोग्यावर अनेक वाईट परिणम होतात.
5) लगेच झोपणे- मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच झोपत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही अनेक रोगांना आमंत्रण देत आहात. मटणात तिखटाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पित्त आणि जळजळ यांसारख्या समस्या लगेच उद्भवतात.