आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वर्तमानात ज्या काही गोष्टी आपण करतो, त्याच गोष्टींचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर पडतो. आपण कोण आहोत किंवा भावी आयुष्यात आपण कोण असणार, हे आपल्या वर्तमानावरच ठरते. त्यामुळे भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमण्यापेक्षा वर्तमानात जगणे महत्त्वाचे ठरते. यासाठी श्वासावर लक्ष केंद्रीत करा. यातून तुम्ही वर्तमानात याल आणि जगणे आपोआप समृद्ध होईल.
जाणून घ्या पद्धत
१. वर्तमानात जगण्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतात.
२. दिवसातला काही काळ, काही मिनिटे श्वासाबरोबर म्हणजे वर्तमानात जगल्यास, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
३. जी वेळ सोयीची असेल, त्या वेळी श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कसा येतो, कसा जातो ते अनुभवा.
४. श्वासाचा तो उबदार अनुभव घ्या.
५. श्वास घेताना पोटाकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास आणि उच्छवासाबरोबर पोटाचीही हालचाल होते. पोटाची ती हालचाल कशी होते ते अनुभवा.
६. श्वासाची आणि पोटाची ही हालचाल आपल्याला वर्तमानात राहायला शिकवेल.
७. श्वासाचे, जगण्याचे बोट धरा आणि भूतकाळ, भविष्यकाळातून वर्तमानात या. तो जगणे अधिक आश्वस्त करतो.