आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजच्या काळात चुकीच्या आहारामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत. यामुळे अगदी लहान वयातच केस गळणे, केस पांढरे होणे तसेच त्याच्या संबंधित इतर समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. आपण इच्छित असल्यास आपण अश्वगंधा वापरू शकता. औषधी गुणधर्म असलेले अश्वगंधा समृद्ध हेअरपॅक हे केसांशी संबंधित समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. आपण हेअरपॅक दोन वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता…
शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल
१) अश्वगंधा हेअरपॅक
साहित्य
१) अश्वगंधा पावडर – २ चमचे
२) नारळ तेल – ३ चमचे
३) गिलॉय – केसांच्या लांबीनुसार
सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या
बनवायची पद्धत
१) सर्व साहित्य टाकून मिश्रण तयार करावे.
२) तयार मिश्रण सुमारे तीस मिनिटे केसांवर लावून ठेवा.
३) नंतर पाणी आणि सौम्य शाम्पूने केस धुवा.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या
फायदा
यामुळे मुळांपासून केसांना पोषण मिळेल. तसेच केस गळतीची समस्या कमी होऊन नवीन केस वाढण्यास मदत होईल.तसेच पांढरे केसांची समस्या देखील कमी होऊन केस चमकदार होतील.
2) अश्वगंधा हेअरपॅक
साहित्य
१) नारळ तेल – १ कप
२) अश्वगंधा पावडर – ४ चमचे
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
पद्धत
१) यासाठी कमी गॅसवर नारळाचे तेल कोमट होईपर्यंत गरम करावे.
२) त्यानंतर त्यात अश्वगंधा पावडर टाकून मिश्रण एकजीव करावे आणि सुमारे १० ते १५ मिनिटे शिजवावे.
३) तेल थंड झाल्यावर ते एका बाटलीत भरावे.
४) या मिश्रणाने सुमारे १० मिनिटांसाठी केसांची मालिश करा. आणि एक तास तसेच राहू द्या.
५) नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
उन्हाळ्यात आंबा लस्सी पिऊन शरीर आणि मन दोन्ही Cool ठेवा
फायदा
यामुळे केस गळणे थांबेल तसेच केस मजबूत आणि चमकदार होतील तसेच डोक्यातील कोंडा देखील कमी होईल.
अश्वगंधा कसे काम करते
त्यात टायरोसिन नावाचे एमिनो ॲसिड असतात. हे मेलेनिनचे उत्पादन वाढविण्याचे कार्य करते. हे केसांना पोषण आणि नैसर्गिक रंग देते. अश्वगंधा शरीरात कोर्टीसोल हार्मोन म्हणजे स्ट्रेस हार्मोन नियंत्रित करण्यास मदत करते. हे केस गळणे थांबविण्यास आणि नवीन केस येण्यास मदत करते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
उन्हाळ्यात आंबा लस्सी पिऊन शरीर आणि मन दोन्ही Cool ठेवा
घरच्या घरी पार्लर ट्रीटमेंटसारखी चमक मिळवा, खुपच कमालीचा आहे हा DIY फेस पॅक
सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या