आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Sudden Weight Loss | शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आजच्या युगात वजन कमी करण्यासाठी लोक सर्व प्रयत्न करतात. परंतु, आहारात कोणताही बदल न करता किंवा शारीरिक श्रम न करता तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले असेल, तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. (Sudden Weight Loss)
तज्ज्ञ सांगतात की, जर तुमचे वजन 6 महिन्यांत अचानक 5% कमी झाले तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. मात्र, वजन झपाट्याने कमी होणे जीवन बदलणार्या किंवा तणावपूर्ण घटनांमुळे सुद्धा होऊ शकते.
1. आतड्यांसंबंधी रोग (Intestinal diseases) :
आतड्यांसंबंधी किंवा पोटाशी संबंधित कोणत्याही आजारामुळे शरीर पुरेसे अन्न घेऊ शकत नाही. शरीरापर्यंत पोचणारे अन्नही नीट वापरले जात नाही. (Sudden Weight Loss)
2. मधुमेह (Diabetes) :
वजन कमी होण्याचे एक कारण टाइप 1 मधुमेह असू शकते. तुम्हाला टाइप 1 मधुमेह असल्यास,
रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील (Pancreas ) इन्सुलिन तयार करणार्या पेशींवर हल्ला करते.
इन्सुलिनशिवाय, शरीर उर्जेसाठी ग्लुकोज वापरू शकत नाही. यामुळे रक्तातील साखर वाढते.
3. कर्करोग (Cancer) :
कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये जलद वजन कमी होते. कारण कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमुळे,
त्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते, जे वजन कमी होण्याचे कारण आहे.
4. एड्स (AIDS) :
एचआयव्ही हा देखील इतर व्हायरसप्रमाणेच एक व्हायरस आहे, फरक एवढाच आहे की रोगप्रतिकारक शक्ती इतर व्हायरसचा नाश करते,
इथे हा व्हायरस नष्ट न होता उलट, तो रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करतो. यामुळे या व्हायरसने ग्रस्त लोकांचे वजन अचानक कमी होऊ शकते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Arthritis Cause Cauliflower | arthritis cause cauliflower can increase uric acid in the body may be trouble in walking in winter
Spinach Benefits | हिवाळ्यातील सुपरफूड आहे ही हिरवी पालेभाजी, इम्युनिटी सुद्धा होते मजबूत
Stitch Scars Removing Tips | एलोवेरा आणि लिंबूच्या रसाने घालवा त्वचेवरील टाक्यांचे व्रण