आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सिगारेट ओढताना त्यामधून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ रसायने खुप हानिकारक असून त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. ही रसायने शरीराचे मोठे नुकसान करतात. धुम्रपानामुळे शरीरावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे.
डीएनए
सिगारेटमधील फेनानथरेन घटक रक्तात मिसळतो आणि डीएनएचे नुकसान करतो. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
तोंड
सिगारेटच्या धुरातील रसायनांमुळे तोंड कोरडे होते. दातांच्या समस्या निर्माण होतात. यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
डोळे
सिगरेटमधील तंबाखूतील ऑक्सिडेंट्समुळे डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. यामुळे डोळ्यांचे तेज कमी होणे, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन आणि ऑप्टिक न्युरोपॅथी आदी समस्या होतात.
हाडे
यातील निकोटीन अॅस्ट्रॉजन हार्मोन्सवर परिणाम करत असल्याने हाडे ठिसूळ होतात.
रक्ताभिसरण
याच्या धुराचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊन ही प्रकिया मंदावते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे ५१ टक्के वाढते.
मेंदू
सिगारेट ओढल्याने मेंदुतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होऊन मेंदूची क्षमता कमी होते.
ह्रदय
या व्यसनामुळे उच्च रक्तदाब वाढतो. यामुळे स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा धोका वाढतो.
यकृत
टार जमा झाल्याने यकृतचा कॅन्सर वाढण्याची ९० टक्के शक्यता वाढते.
हे उपाय करा
1) दररोज गाजराचा रस प्यायल्यास यातील अॅन्टिऑक्सिडेंट्स शरीरातील निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते.
2) ब्रोकोलीचे नियमित सेवन केल्यास यातील विटॅमिन बी, बी५ आणि सी शरीरातील निकोटिन बाहेर काढते.
3) काकडी नियमित खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते आणि निकोटिन बाहेर पडते.
४) एक कप पाण्यात आल्याचा तुकडा गरम करुन प्यायल्यास यातील अॅन्टिऑक्सिडेंट्समुळे निकोटिन बाहेर पडते.
५) आहारात नियमित कोशिंबिरीचा समावेश करावा.
६) दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्यास विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.
७) नाश्त्यात अंकुरीत कडधान्य घेतल्यास निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते.
८) आहारात पालकचा समावेश केल्यास फॉलिक अॅसिड आणि विटॅमिन बी ९ शरीरील टॉक्सिन्स बाहेर काढते.