आरोग्यनामा ऑनलाईन- असंही एक फळ आहे जे फारसं आपल्या परिचयाचं नाही. परंतु त्यात मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. या फळाचं नाव आहे अॅप्रिकोट. आज आपण या फळाच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
अॅप्रिकोट खाण्याचे फायदे –
1) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2) डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अॅप्रिकोटच्या रसाचं सेवन करावं.
3) अॅप्रिकोटमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळं त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा तजेलदार दिसते.
4) अॅप्रिकोट खाल्ल्यामुळं केसगळती काही काळात कमी होतो.
5) रक्ताची कमतरता भरून निघते.
6) रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी नियंत्रणात राहते.
7) हाडं बळकट होतात.
8) पचनसंस्थेचं कार्य सुधारतं ज्यामुळं पचनक्रिया चांगली राहते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.