आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी पडू लागते आणि याचा परिणाम त्वचेसह ओठ आणि शरीराच्या इतर भागांवर सुद्धा दिसू लागतो. याची सोपी पद्धत आहे आंघोळीनंतर ताबडतोब संपूर्ण शरीरावर चांगल्याप्रकारे मॉयस्चरायजर(Apply ) लावणे. परंतु, तुम्हाला त्वचा मॉयस्चराईज(Apply ) ठेवण्यासह चेहर्याचा रंग उजळवायचा असेल तर खाली दिलेल्या चार वस्तूंचा वापर खुपच लाभदायक ठरेल.
या आहेत त्या वस्तू
1 एलोवेरा जेल
एलोवेरा जेल मुरूमे आणि सुरकुत्यांना दूर ठेवते. दिर्घ सौंदर्य हवे असेल तर एलोवेरापेक्षा चांगले, नैसर्गिक आणि स्वस्त ब्युटी प्रॉडक्ट असूच शकत नाही.
2 कच्चे दूध
कच्चे दूध कॉटनच्या मदतीने चेहर्यावर लावून काहीवेळ मसाज करा. 10-15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. दुसरी पद्धत आहे कच्च्या दुधात थोडी हळद पावडर मिसळा आणि चेहर्याला मसाज करा. यामुळे दुप्पट फायदा मिळतो.
3 खोबरेल तेल
रिंकल्स कमी करण्यासाठी आणि फ्रेश, यंग लुकसाठी झोपण्यापूर्वी चेहर्यावर खोबरेल तेला लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. नियमित हा उपाय केल्यानंतर फरक लवकर दिसून येतो.
4 मध
हिवाळ्यात त्वचेसाठी मध सुद्धा खुप लाभदायक ठरते. मधात दूधापासून पपई, हळद इत्यादी वस्तूंचा वापर करता येईल. हे सर्व नॅचरल आहे. यामुळे साइड इफेक्ट्सचा धोका नाही. आंघोळीपूर्वी मध, हळद आणि दोन ते तीन थेंब लिंबू रस मिसळून हे मिश्रण चेहर्याला 10-15 मिनिटे लावून ठेवा. यामुळे अनेक समस्या दूर होऊन चेहरा उजळलेला आणि तरूण दिसेल.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.