आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात केस तेलकट आणि चिपचिप होणे साहजिक आहे. केसांचा तेल कटपणामुळे फक्त केस चिपचिप नाही दिसत तर आपल्या चेहऱ्यावर मुरूम देखील येतात. केसांमधील चिकटपणामुळे कोंडा, दुर्गंध आणि केस गळतात. आपण काही घरगुती उपाय करून समस्या कमी करू शकतात. जेणेकरुन तुम्ही ही समस्या कमी करू शकतात. एवढेच नाही तर आपले केस लांब, जाड आणि मजबूत देखील होतील.
विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं
१) टोमॅटोपासून बनवलेला हेअर मास्क-
यासाठी प्रथम टोमॅटोचा रस काढा. आता त्यात मुलतानी माती मिसळा आणि चांगले मिसळा आणि टाळूवर लावा. आणि हलक्या हातांनी मालिश करा. हे हेअरमास्क ३० मिनिटांसाठी केसांवर लावा. नंतर केस धुवा.
सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी बनवलेले सनस्क्रीन लोशन वापरा, जाणून घ्या
२) हरभरा पीठ आणि दही-
केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी हरभरा पीठ आणि दही मिसळा आणि टाळूवर लावा आणि १०-१५ मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे केसांतील चिकटपणा देखील दूर होईल.
उन्हाळ्यात आंबा लस्सी पिऊन शरीर आणि मन दोन्ही Cool ठेवा
३) लिंबू आणि अंडी-
शॅम्पू करण्याच्या १ तासापूर्वी लिंबाच्या रसामध्ये अंड्यातील पांढरा मिसळा आणि टाळूवर लावा. हे केसांतील चिकटपणा दूर करण्यात आणि केसांना कंडिशनिंग करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
४) ब्लॅक टी-
एका कप पाण्यात चहा पावडर घाला आणि १० ते १५ मिनिटे उकळवा. हे पाणी चाळून घ्या आणि थंड होऊ द्या. नंतर ते आपल्या केसांवर लावा आणि थोड्या वेळाने धुवा.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या
५) ॲपल सायडर व्हिनेगर-
एक कप पाण्यात ३-४ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घाला आणि ते टाळूमध्ये लावा आणि नंतर थोड्या वेळाने केस धुवा. हे केसांमधील चिकटपणा दूर करेल.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल
गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या