आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या कमी वयातच त्वचा खराब दिसण्याची समस्या वाढत चालली आहे. आरोग्यदायी जीवनशैली, पुरेशी झोप यासह कॉस्मेटिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानानेही त्वचा निरोगी ठेवता येते. सीटीसी रेजिन वापरल्यास, त्वचा दिवसातून दोन वेळा धुतल्यास आणि अल्कोहोल-फ्री टोनर वापरल्यास त्वचा तजेलदार होते.
सनस्क्रिन
ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा वापर करावा. त्यात एसपीएफ कमीत कमी ३० असावे. सनस्क्रीनमध्ये अँटी ऑक्सिडंट आहेत, हे पाहावे. छोटे पॅक खरेदी केल्यास कोठेही नेता येणे सोपे जाते.
मॉइश्चरायझर व डे क्रीम
बॉडी लोशन किंवा डे क्रीम खरेदी करताना लेबलवर अँटी ऑक्सिडंट्स आणि बोटॅनिकल अॅक्सट्रेक्ट्सची माहिती तपासावी. अँटी ऑक्सिडंट्स आणि बोटॅनिकल्स यांना जीवनसत्त्वे आणि जैविके या दोन प्रकारांत विभागतात.
सेरम, नाइट क्रीम
हे रेटिनॉइड्स, एएचए आणि पेप्टाइड्सचे कॉम्बिनेशन्स असतात. यापैकी रेटिनॉइड ट्रिटिनॉइन प्रभावी असते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हे वापरावे. त्वचेतील पेशींची नैसर्गिकरीत्या निर्मिती करण्यासाठी पेप्टाइड्सची मदत होते.
वय २० ते ३० वर्षे
या वयात एल-अॅस्कॉर्बिक अॅसिड, एएचए, रेटिनॉल बूस्टर आणि इलास्टिनसारखे घटक असणारी क्रीम उत्तम असतात.
वय ३० ते ४०
या वयात क्रीम आणि सिरममध्ये हायअॅल्युरॉनिक अॅसिड, रेटिनाल्डिहाइड, टोकोफेरिल, पेप्टाइड-व्हिटॅमिन सी, सायट्रिक अॅसिड आणि अॅमिनो पेप्टाइड्स असावे. हे विची लिफ्टअॅक्टिव्ह सीएक्सपी टोटल आणि आईज अँटी-रिंकल क्रीम, ओले रीजनरिस्ट नाइट क्रीम आणि सिरममध्ये मिळतात.
वय ५० वर्षे
या वयात सीटीसी रेजिन लावावे. नाइट क्रीममध्ये आणि सिरममध्ये रेटिनॉल बूस्टर्स, अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असावे. तसेच यूबीक्विनोन आणि ट्रेटिनॉइनसारखे अॅक्टिव्ह असावेत. हे विची लिफ्टअॅक्टिव्ह रेटिनॉल एचए नाइट व डीसीएल डर्मेटोलॉजिक कॉस्मेटिक लॅबोरेटरीज वायक्यू स्ट्राटममध्ये असतात.