• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home Yoga Day Special

Yoga Day 2019 : योगा शिकायचाय ? हे अ‍ॅप करतील तुमची मदत

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 21, 2019
in Yoga Day Special
0
yoga-app
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी २१ जूनला हा दिवस साजरा केला जातो. १० डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २०१५ सालापासून हा दिन पाळण्यास सुरुवात झाली. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनासाठी पुढाकार घेतला आहे. २१ जूनला देशभरात योग दिवस साजरा केला जातो. अशा या योग दिनाच्या मुहुर्तावर तुम्ही योगा शिकण्याची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर म्हणजे आता योगा शिकण्यासाठी तुम्हाला खास प्रशिक्षकाची गरज नसून एक अ‍ॅप फक्त मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्या आणि निश्चिंत होऊन योगा शिका.निरोगी जीवनासाठी योगाचे खूप महत्व आहे. तसेच नियमित योगा केल्यास अनेक आजरांना आपण दूर ठेवू शकतो. अशी काही अ‍ॅप आहेत जी तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, स्मार्टवॉच अथवा टॅबमध्ये डाऊनलोड करून योगा करू शकता. डेली योगा या अ‍ॅप्समध्ये विविध प्रकारचे योगा कसे करावे याची माहिती दिली असून तुम्ही त्याद्वारे योगा बिनचूक करू शकता. हे अ‍ॅप खास अ‍ॅपल युजर्ससाठी असून ते तुम्ही आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल वॉचमध्ये इन्स्टॉल करू शकता.

डेली योगा अ‍ॅपमध्ये पाचशेपेक्षा जास्त आसनांचे प्रकार असून २०० योगा क्लासेस, मेडिटेशन आणि पन्नासपेक्षा जास्त वर्कआऊट प्लॅन दिले आहेत. शिवाय, या अ‍ॅपद्वारे आपल्याला दहा तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. नवीनच योगा शिकणारांना हे तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करतात. या अ‍ॅपमध्ये नवीन योगा शिकणारे ते तज्ज्ञ असे विविध भाग आहेत. प्रत्येक भागात क्लास प्लॅन दिला असून त्याद्वारे तुम्ही योगातून जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मिळवू शकता.डेली योगा अ‍ॅपला तुम्ही अ‍ॅपल अ‍ॅपशी जोडू शकता. प्रत्येक योगा प्रकार केल्यानंतर तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या आहेत हेसुद्धा या अ‍ॅपमुळे समजणार आहे. तसेच अ‍ॅपल हेल्थ आणि डेली योगा डाटा लॉगच्या मदतीने तुम्ही तुमची रोजची कार्यही बघू शकता.तसेच आणखी एक अ‍ॅप असून त्याचे नाव ब्रीथ अ‍ॅप आहे. हे एक अ‍ॅपल वॉचमधील अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप दिर्घश्वासाच्या अनेक व्यायाम प्रकारात मार्गदर्शन करते. तसेच ते दररोजचा श्वासाबाबत सूचनाही करते. यामध्ये आपण आपल्या सवडीनुसार दिर्घश्वास घेण्याची वेळ निर्धारित करू शकतो.

योगा वेव्ह हे अ‍ॅप देखील योगाप्रेमींसाठी उपयोगी आहे. हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येते. शिवाय हे अ‍ॅप योगाची सुरूवात करणारे आणि ज्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तयार करण्यात आले आहे. यामध्ये दिलेल्या आसनांद्वारे तुम्ही तुमचे शरीर तंदुरूस्त आणि लवचिक बनवू शकता. महत्वाचे म्हणजे या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही योगाबाबतचे तुमचे ध्येय शंभर टक्के गाठू शकता.असाना रिबेल – योगा इन्स्पायर फिटनेस हे अ‍ॅप व्यायामाची आणि सुडौल शरीराची आवड असणारांसाठी आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपण आपले वजन सुद्धा कमी करू शकतो. याशिवाय एक निरोगी जीवन सुद्धा यामुळे जगता येऊ शकते. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असून ते इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगाल आणि स्पॅनिश अशा सहा भाषेत उपलब्ध आहे.योगा गो या अ‍ॅपमध्ये आरोग्य आणि वजन कमी करण्याचे नियोजन दिले गेले आहे. तसेच यामध्ये हेल्दी मील ट्रॅकरसह अन्य सुविधाही आहेत. या अ‍ॅपद्वारे व्यायाम करण्यासाठी ७ ते ३० मिनिटापर्यंतचा कालावधी लागतो. या अ‍ॅपमधील एका सत्रात तुम्ही २०० कॅलरीज बर्न करू शकता. योगा गो हे तुम्ळी हेल्थकीटसोबत जोडू शकता. ज्यामध्ये फिटनेसची माहिती घेऊ शकता.

Tags: apparogyanamahealthMobileSmartphoneyogayoga dayअ‍ॅपआरोग्यआरोग्यनामायोगा दिवसव्यायामस्मार्टफोन
Uric Acid | health diet tips how to control uric acid
ताज्या घडामाेडी

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

by Nagesh Suryawanshi
April 13, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Uric Acid | बदलत्या जीवनशैलीत लोक वेळेवर झोपत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, कसलाही व्यायाम करत नाहीत....

Read more
Summer Desserts | summer food include these desserts in your diet keep you cool

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

April 13, 2023
Raw Mango Chutney | health raw mango advantages kacche aam ki chutney is beneficial for health know its benefits and recipe

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी

April 13, 2023
Summer Skin-Care Routine | summer skin care routine 12 skincare products

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

April 5, 2023
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

March 16, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021