नियमित एक सफरचंद खा…आणि ठणठणीत राहा

July 3, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सफरचंद अनेक रोगांची शक्यता कमी करते. म्हणून दररोज एक सफरचंद खावे, असे तज्ज्ञ सांगतात. संत्रे किंवा केळ्यापेक्षा सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी अँटीऑक्सिडेंट्सची आवश्यकता असते. तसेच अन्य काही आजारात सफरचंद अत्यंत उपयुक्त ठरते. दररोज दोन सफरचंद खाल्ल्यास अस्थमाची समस्या तीन पटीने नियंत्रणात राहते, असे अमेरिकन र्जनल ऑफ रेस्पायरेटीर क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

व्यायाम केल्याने अस्थमा पीडित व्यक्तींला त्रास होतो, अशावेळी त्या व्यक्तीस सफरचंद खाण्यास द्यावे. दररोज ७५ ग्रॅम वाळवलेले सफरचंद खाल्ल्यास एलडीएल नावाच्या घातक कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी होते. सफरचंदातील असिटिक अँसिडमुळे एंजिओटेंसिन २ नावाच्या हार्मोन्सची सक्रियता वाढते. हा घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतो, असे संशोधनात आढळून आले आहे.

शरीरात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्निशियम, विटामीन बी आणि सी ची कमतरता असल्यास स्नायू आकडणे, दुखणे असा त्रास सुरू होतो. ही पोषक तत्त्वे सफरचंदात असल्याने असा त्रास होत असल्यास सफरचंद नियमित खावे. पोटात कॅल्शियम आणि मॅग्निशियमचे शोषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एंझाइम्सची सक्रियता सफरचंदाच्या सालीमुळे वाढू शकते. सफरचंद खाताना हिरड्यांचा चांगला व्यायाम होतो. त्याचप्रमाणे हिरड्यांच्या स्नायूमधील रक्तसंचार वाढतो आणि दातांना बळकटी मिळते. तसेच दातांची नैसर्गिक चमक वाढते.