आरोग्यानामा ऑनलाइन टीम – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे फुप्फुसाचा व तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. यातील निकोटीन या घातक पदार्थामुळे सर्दी खोकल्यापासून न्यूमोनिया, कर्करोगापर्यंत अनेक रोग होऊ शकतात. याशिवाय शरीरातील १० अवयवांवरही गंभीर परिणाम होतो. विडी, सिगारेट, सिगार, हुक्का, गुटखा, तपकीर व मशेरीसाठी तंबाखूचा वापर केला जातो. ही सर्व व्यसने घातक आहेत.
हे आहेत गंभीर परिणाम
१ डोळ्यावर ताण पडतो. धुरामुळे डोळ्यांचे नुकसान होते.
२ धमन्या आकुंचन पावतात व रक्तपुरवठा कमी होतो. कार्डिओ व्हॅस्क्युलरवर परिणाम होतो.
३ ह्युमन पालीलोमा व्हायरसमुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
४ धुरामुळे अन्ननलिकेचा खालील भाग शिथिल बनतो. अन्ननलिकेचे नुकसान होते. त्यातून कर्करोगाची शक्यता असते.
५ पुरुषांमध्ये इरेक्शनसाठी पेनिसच्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येतो.
६ पुरुषांच्या प्रजनन हार्मोन्सवर परिणाम होतो. शुक्राणूंची निर्मिती घटते.
७ मुत्रामध्ये अॅल्युमिनिअमचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीला रक्तपुरवठा वाहिन्या अरुंद होतात. किडनीचे कार्य कमी होते.
८ त्वचेचे विकार जडतात. सुरकुत्याही पडतात. अकाली वृद्धत्व येते.
९ गर्भधारणेमध्ये अडथळे येतात. फेलिपाईन ट्यूबला झालेली गर्भधारणा गर्भाशयामध्ये पाठवणे कठीण जाते.
१० गर्भाशय, मासिक पाळीवर विपरीत होत असतो. रक्तवाहिन्या व गर्भाशयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा येतो.