अकाली म्हातारपण टाळायचे असेल तर ‘हे’ उपाय करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कधीकधी कमी वयातच त्वचेचा तजेलदारपणा कमी-कमी होत जातो. आहाराकडे दुर्लक्ष, पोषक आहाराची कमतरता या कारणामुळे हे होत असते. याचा परिणाम चेहऱ्यावर होतो. आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, चेहरा कोरडा पडतो. तसेच काळे डाग पडण्यास सुरूवात होत. कमी वयात म्हाताऱ्यासारखा चेहरा दिसू लागतो. मात्र, काही घरगुती उपाय केल्यास अचानक येणारे म्हातारपण टाळता येते.
ही आहेत कारणे

* छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेतल्याने स्वभाव चिडचिडा होतो. या चिडचिडेपणामुळे चेहऱ्यावर ताण येऊन वयाच्या आधिच व्यक्ती म्हातारा दिसू लागतो.

* धूम्रपान आणि दारूचे अतिसेवन केल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि चेहरा कोरडा पडण्यास सुरूवात होते.

* चुकीच्या आहारामुळे अकाली म्हातारपण येते. जास्त तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर पिपल्स, सुरकुत्या येतात. शरीरातील प्रोटीन आणि जरूरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अकाली वृद्धत्व येते.

* कमी झोपेमुळे अकाली म्हातारपण येऊ शकते. डोळ्यांखाली काळी वर्तूळे पडतात. चेहऱ्याची चमक कमी होते. यामुळे इतरही आजार होऊ शकतात.

हे उपाय करा

* त्वचेवर धूळ माती आणि प्रदूषणाचा मारा होत असतो. यासाठी चेहऱ्याची नियमित स्वच्छता करावी. दिवसातून चेहरा कमीत कमी तीनवेळा चांगला धुवावा. चेहरा साफ करण्यासाठी गुलाब पाण्याचाही वापर करता येईल.

* मॉयश्चराइजर त्वचेचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी मदत करतो. अ‍ॅन्टी एजिंग क्रीमचा वापर करावा. बाहेर जातांना सनस्क्रीन लोशन वापरावे.

* व्यायामाने तन आणि मन दोन्ही सक्रिय राहते. नियमितपणे पायी चालणे, योगा आणि थोडा व्यायाम केल्याने त्वचा तजेलदार होते.

* गाजर, मेवा, त्वचेसाठी चागले असते. त्याच बरोबर भरपूर पाणी पिण्यानेपण त्वचा तजेलदार दिसते.

* लसुन आरोग्यासाठी लाभदायक आहे. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शरिरातील रक्ताभिसरण यामुळे सुधारते.

* फळे व भाज्या खाल्ल्याने मस्क्युलर डिजेनरेशनचा धोका कमी होतो. मस्क्युलर डिजेनरेशनमुळे वाढत्या वयात डोळ्यांची द्दष्टी कमी होते. त्यामुळे जेवणात भरपूर फळे आणि भाज्याचे सेवन करावे.