आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हार्ट अॅटॅक येण्याची प्रमुख कारणे जवळपास सर्वांनाच माहित असतात. कारण, आपल्याकडे या आजाराचे प्रमाण अतिशय वाढले आहे. टेन्शन, धुम्रपान, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे हृदयविकार होतात. संशोधकांनी तब्बल एक लाख पेशंट्सचा पाच ते नऊ वर्षांपर्यंत अभ्यास केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे हे नवे कारण समोर आले आहे.
* हे आहे नवे कारण
रक्तातील फॉस्फेटचे प्रमाण जर प्रमाणापेक्षा कमी असेल, ती हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
* संशोधकांनी हे सांगितले…
१. फॉस्फेट हे एक प्रकारचे खनीज आहे. शरीरात खनिजांची आवश्यकता असते. त्यांच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे आजारही होऊ शकतात, त्यापैकीच एक हृदयविकार होय.
२. मात्र, खनिजांचे प्रमाण शरीरात जास्त असले तरी विविध विकार होऊ शकतात.
३. शरीरातील खनिजांचे प्रमाण योग्य राखले पाहिजे.