आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Anemia | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया (Anemia) होण्याचा मोठा धोका असतो. रक्ताच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने थकवा, निस्तेज पांढरा चेहरा, वेदनादायक पाळी, धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे, हाता-पायात कमजोरी, डोकेदुखी, जीव घाबरणे, पिवळी त्वचा, कोरडी त्वचा, केस गळणे, तोंडावर सूज, जिभेवर फोड, नखांवर परिणाम होणे, कमी भूक, हात-पाय थंड पडणे, सतत इन्फेक्शन होणे आदी लक्षणे दिसतात. खाण्या-पिण्याच्या काही वस्तूंचे सेवन करून तुम्ही रक्ताची कमतरता दूर करू शकता.
रक्ताच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी या वस्तू खा
1. आहारात आयर्नची पातळी वाढवणार्या पदार्थांचा समावेश करा.
2. मांस (चिकन आणि मासे).
3. धान्यापासून बनवलेले पदार्थ (ब्रेड आणि पास्ता). Anemia
4. सूकामेवा (जर्दाळू, मनुका, सुका आलुबुखार).
5. हिरव्या पालेभाज्या (पालक ई.)
6. धान्य (ब्राऊन राईस, गव्हाचे तृण, धान्याचा कोंडा).
7 मटर, नट्स आणि अंडे.
यामुळे सुद्धा वाढते रक्त
– टोमॅटो
– काजू
– केळे
– भोपळा आणि आळशीचे बी
– अंजीर
– आवळा
Web Title :- Anemia | increase blood with 7 iron rich foods that can prevent you anemia and iron deficiency how to increase blook