आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी अनेकजन डाएट करतात. मात्र, हे डाएट तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करणे शरीराला घातक ठरू शकते. सोशल मीडिया अथवा कुणाच्या सांगण्यावरून डाएट करणे धोकादायक ठरू शकते. अलिकडे वजन कमी करण्यासाठी लो-कार्बोहायड्रेटचे अधिक सेवन केले जाते. या डाएटमुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी चांगले नसतात. यावर जपानमध्ये एक संशोधन करण्यात आले असून त्यानुसार अधिक लो-कार्ब डाएट केल्यास वृद्धत्व लवकर येऊ शकते आणि अकाली मृत्यूचाही धोका वाढत असल्याचे आढळले आहे.
जपानच्या या संशोधकांनी म्हटले आहे की, आतंड्यांची चरबी घटवण्यासाठी आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लो-कार्ब फायदेशीर असले तरी हे डाएट एक्सपट्र्सच्या मार्गदर्शनाखालीच करावे. वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब डाएट फायदेशीर असते. पण जास्त काळासाठी सतत कमी कार्बोहायड्रेटच्या सेवनामुळे शरीरावर वाईट प्रभाव पडतो. जास्त काळ लो-कार्ब डाएट घेतल्याने लिव्हरचा आजार होऊ शकतो. कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे लिव्हर फॅट आणि प्रोटीनमुळे ग्लूकोज तयार होऊन शरीरात अमोनियाचा स्तर वाढतो. शरीरासाठी सर्वच पोषक तत्व असलेली डाएट गरजेची असते. प्रमाणापेक्षा जास्त कार्बोहायड्रेटचे सेवन केल्यस शरीराला कोणतेही पोषक तत्त्व मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊन कॅल्शिअम, मॅग्नेशिअमची देखील कमतरता होते. कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे इले क्ट्रॉलाइटचा स्तर कमी होऊन शरीरातील मांसपेशी कमजोर होतात. कमजोर मांसपेशींमुळे थकवा आणि अंगदुखीची समस्या वाढते. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ग्लूकोजची गरज असते. शरीरातील ५० टक्के ग्लूकोजचा वापर मेंदूकडून केला जातो. शरीरात ग्लूकोज कार्बोहायडड्ढेटच्या माध्यमातून वाढते. कमी कार्बोहायड्रेटमुळे मेंदूसाठी गरजेचे ग्लूकोज मिळू शकत नाही. कार्बोहायड्रेटचे प्रमाण आहारात किती असावे हे व्यक्तीच्या वयावर, वजनावर, उंचीवर आणि लिंगावर अवलंबून असते. एका निरोगी व्यक्तीस १३० ग्रॅम कार्बोहाड्रेटची रोज गरज असते. लो-कार्ब डाएट घेत असल्यास हेल्दी कार्बोहायड्रेट असलेल्या ब्राऊन राइस, गहू, बाजरा, डाळी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.