आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशींवर अनेक कारणांनी नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी संसर्ग आणि अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो. शरीराची प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? याची कारणे जाणून घेतली पाहिजेत. रोग प्रतिकारशक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. नोकरीची अनिश्चितता आणि अहोरात्र काम केल्याने होणारा मानसिक ताणही प्रतिकारशक्तीसाठी घातक ठरू शकतो. तणावामुळे सेल्स पेशींची कार्यप्रणाली निष्क्रिय होऊ लागते. जीवनसाथीच्या मृत्यूने होणाऱ्या भावनात्मक आघातामुळे विधवा किंवा विधूर यांचे आरोग्यही पहिल्या वर्षी अत्यंत खराब असते.यासाठी आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. निखळ मनाने हसत राहिले पाहिजे. अशा प्रकारे वागणाऱ्या लोकांच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन नियंत्रित राहतो. तर जास्त गंभीर असणाऱ्या लोकांमध्ये असे होताना दिसत नाही, असे एका संशोधनात आढळून आले आहे. ज्या वयस्कर लोकांना एक तास आवडता व्हिडिओ पाहण्याची सवय असते त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत असते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
हे संशोधन लोमा लिंडा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये करण्यात आले. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आवडती विनोदी मालिका किंवा चित्रपट पाहावा आणि मनमोकळे हसावे. यामुळे तणावही कमी होतो. अँटिबायोटिक्सवर अवलंबून राहिल्यास शरीरात सायटोकिन्सची पातळी कमी होते. हा प्रतिकारशक्तीचा हार्मोन मॅसेंजर आहे. हा दुबळा होताच शरीराची बाह्यसंसर्ग आणि हानिकारक जिवाणूंशी लढण्याची क्षमता दुबळी होते. यासाठी केवळ अँटिबायोटिक इंफेक्शनने पीडित असल्यासच अँटिबायोटिक्स घ्यावे. तसेच हा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावा.धुराच्या संपर्कात येत असल्यास (पॅसिव्ह स्मोकिंग) प्रतिकारशक्ती दुबळी होऊ शकते. यामुळे दम्याचा झटका आणि विविध प्रकारची अॅलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. सुमारे ३००० पेक्षा जास्त धूम्रपान न करणाऱ्या लोकांचा मृत्यू लंग कॅन्सरमुळे झाला होता, ही बाब अमेरिकेतील एका संशोधनातून उघड झाली आहे. तसेच तीन लाख मुले श्वसनाशी संबंधित संसर्गाने आजारी असल्याचेही या संशोधनात स्पष्ट झाले होते.
हा धोका टाळण्यासाठी आजूबाजूला कुणीही धूम्रपान करत असेल तर तेथे कदापिही थांबू नका. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना धूम्रपान न करण्याचा सल्ला द्या.नियमितपणे व्यायाम करत नाहीत ते लोक व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आजारी पडतात. व्यायाम न करणारे लोक पीडित होण्याचा धोका दुप्पट असतो. यासाठी ३० मिनिटांचा एरोबिक व्यायाम केल्यास पांढऱ्या रक्त पेशींच्या (डब्ल्यूबीसी) संख्येत वाढ होऊन प्रतिकारशक्तीही बळकट होते.कामाचा ताण असल्यास योगासने आणि ध्यान साधना करावी,जेणेकरून मानसिक समाधान मिळू शकेल. एकटे राहू नये आणि सतत सामाजिक उपक्रमात स्वत:ला गुंतवून ठेवावे. व्यक्तीचा घर, कार्यालय आणि समाजाशी जेवढा जास्त संपर्क किंवा जवळीकता असते तेवढी आजारी पडण्याची शक्यता कमी होते. यासाठी वेळ काढून सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा.