अंधत्वावर मात करण्यासाठी बीग बींचा पुढाकार
आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पोलिओ निर्मुलन, हेपेटायटीस बी, स्वच्छता जनजागृती करताना बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन ना आपण पाहिले आहेत. परंतु,आता बीग बी यांनी आता नवी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. डोळ्यांची काळजी घेऊन अंधत्वावर मात करण्यासाठी त्यांनी #seenow ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
उत्तर प्रदेशातील जनतेसाठी ही मोहीम सुरू करण्यात आलीआहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली, सितापूर, लखनऊ, लखिमपूर खेरी आणि उन्नाओ या ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे. येथील जनतेला डोळ्यांच्या आरोग्याबाबत रेडियो, टीव्ही, व्हॉट्सअॅप, सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती देण्यात येणार आहे.
अमिताभ यांनी ट्विटरवरून मोहिमेची माहिती देण्यासाठी टाकलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, अंधार हळूहळू येतो आणि आपल्या डोळ्यांचे देखील तसेच आहे. डोळ्यांची दृष्टी एकदा गेली की ती पुन्हा येऊ शकत नाही. मात्र डोळ्यांची दृष्टी जाण्यापासून ती वाचवू शकतो. डोळ्यांच्या छोट्या समस्यांना मोठ्या होऊ देऊ नका. सरकारद्वारे असणाऱ्या नेत्र केंद्रामध्ये जाऊन नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या, असा आवाहन बीग बी यांनी केले आहे.