आरोग्यानामा ऑनलाईन टीम : घरात अनेकदा आढळत असलेल्या लाल मुंग्या चावल्यास अॅलर्जी आणि वेदना होऊ शकतात. शिवाय त्या वेगवेगळे बॅक्टेरिया सोबत घेऊन फिरतात. घरातील मुंग्या पळवण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे फारच धोकादायक असते. काही घरगुती गोष्टींचा वापर करून मुंग्या पळवता येऊ शकतात.
करा हे उपाय
१ लवंग
घरातील कोपऱ्यांमध्ये, खिडकींमध्ये लवंग ठेवा. त्याने मुंग्या घरात येणार नाहीत.
२ गव्हाचे पीठ
मुंग्या जेथून येत आहेत तेथे गव्हाचे पीठ टाका. मुंग्यांची रांग दिसेल तर त्यावरही पीठ टाका.
३ मिठ
लादी पुसताना पाण्यात मिठ घाला. त्या पाण्याने लादी पुसा.
४ मिरची पावडर
मुंग्या असलेल्या ठिकाणी थोडी मिरची पावडर टाका.
Visit : arogyanama.com