आरोग्यानामा ऑनलाइन टीम : बदललेली जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे लठ्ठपणाची समस्या भारतात वाढत चालली आहे. वजन वेगाने वाढते, पण कमी करताना ते त्याच वेगाने कमी होत नाही. त्यासाठी खूप वाट पहावी लागते, तसेच खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु, वजन कमी करण्यासाठी फार काही कष्ट न घेता फक्त दररोज एका पदार्थाचे सेवन केल्यास अजिबात कष्ट न घेता एका महिन्यामध्ये चक्क तीन किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते. इसबगोल हा पदार्थ लठ्ठपणा कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. तो ज्यूस अथवा पाण्याबरोबर कसा घ्यायचा ते आपण जाणून घेऊयात. इसबगोल ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्यातील औषधी गुणधर्मांमुळे वजन कमी होते. शिवाय बद्धकोष्टासारख्या समस्यांपासूनही सुटका होते. तसेच आरोग्याच्या विविध समस्यांवर इसबगोल लाभदायी आहे. ते शरीराला डिटॉक्स करते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
इसबगोल भुश्यासारखे दिसते. जेव्हा ते पाणी किंवा ज्यूससोबत घेतले जाते, त्यावेळी ते भिजून वाढते. दोन चमचे इसबगोल भिजवल्यानंतर जवळपास एक ग्लासापेक्षाही जास्त होते. याच कारणामुळे इसबगोलचे सेवन केल्यामुळे पोट बऱ्याच वेळासाठी भरल्यासारखे वाटते आणि यामध्ये कॅलरीदेखील कमी असतात. त्यामुळेच हे वजन कमी करण्यासाठी मदत करते. वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा याचे सेवन करता येईल. रात्री खाण्याऐवजी आणि सकाळी नाश्ता केल्यानंतर इसबगोलचे सेवन करावे. मात्र, जर सतत पोटाच्या समस्या होत असल्याने इसबगोलचे सेवन करू नये.
किडनीच्या समस्या, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्टतेचा त्रास असल्यास इसबगोलचे सेवन करणे फायदेशीर आहे. ते शरीर डिटॉक्स करते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे सतत तहान लागते. त्यामुळे शरीरातून विषारी घटक सहजपणे बाहेर टाकले जातात. इसबगोलमध्ये विघटनशील आणि अविघटनशील दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. त्यामुळे आतड्यांचेही कार्य सुरळीत होते.इसबगोलच्या दोन चमच्यांमध्ये ३२ कॅलरी असतात. याचे सेवन केल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते पण कॅलरी फार कमी असतात. डेली फाइबर सप्लिमेंट म्हणून इसबगोल घेणे फायदेशीर आहे. यामुळे भूक कमी लागते. गरम पाण्यामध्ये किंवा ज्यूसमध्ये इसबगोल एकत्र करून पिता येते. ते चवीलाही उत्तम असते. इसबगोलला स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे हे ज्या पदार्थासोबत एकत्र करण्यात येईल त्याचीच चव यालाही मिळते. दोन चमचे इसबगोल खूप भूक लागली असताना घ्यावे. त्यामुळे भूक नियंत्रित होते.