आरोग्यनामा ऑनलाइन टीम : पाणीदार असलेले द्राक्ष हे फळ सर्वांनाच आवडते. जगात अनेक देशात द्राक्षाचे उत्पन्न घेतले जाते. वेलीवर लोंबणारे द्राक्षांचे घड खूपच सुंदर दिसतात. द्राक्षामध्ये ग्लूकोज आणि डेक्स्ट्रोजची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने शरीरात ऊर्जा उत्पन्न होते. द्राक्ष खाल्याने पचनशक्ती वाढते. किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष हे गुणकारी औषध असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी द्राक्षांचे नियमित सेवन करणे लाभदायक असते.
द्राक्षात अनेक व्हिटामिन्स आढळतात. पहाटे द्राक्ष खाणे शरीरासाठी लाभदायी असते. द्राक्षात ८० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्र नियंत्रित ठेवते. द्राक्षाचा रस सेवन केल्याने मायग्रेनपासून आराम मिळतो. गडद जांभळ्या रंगाचे द्राक्ष पोष्टिक असल्याचे मानले जाते. दीड किलो द्राक्षापासून एक बाटली वाईन तयार केली जाते. ही वाईन सेवन केल्याने भूख वाढते तसेच पचनशक्ती वाढते. शरीरिक थकवा दूर करून रक्त वाढीसाठी फायदेशीर असते.
द्राक्षाची आठ हजार जाती आहेत. इंग्रजीत ग्रेप्स आणि ग्रेप्स फ्रूट अशा द्राक्षाच्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत. ग्रेप्स फ्रूट संत्र्याच्या जातीचे फळ आहे. ग्रेप्स फ्रूट लाल, गुलाबी, निळे, जांभळे आणि पांढऱ्या रंगाचे असते. त्यात पॉली फेनोलिक फायटोकेमिकल असून ते एंटी ऑक्सिडेंट आहे. व्हायरल इंफेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रेप्स फ्रूट खूप गुणकारी आहे. द्राक्षाला संस्कृतमध्ये अंगूर, बंगालीत बेदाने अथवा मनेका, गुजरातीमध्ये धराख, फारसीमध्ये अंगूर, इंग्रजीत ग्रेप्स रॅजिन्स तर लॅटीनमध्ये विटिस विनिफेरा म्हणतात.