आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिंबाचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. आपल्याकडे जेवणावर लिंबू आणि कांदा सेवन केला जातो. कारण लिंबाचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. लिंबाचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा शरीराला चांगला लाभ होतो. लिंबाचा सरबतही सेवन केला जातो. परंतु, प्रत्येकवेळी लिंबू पिळून त्याच्या रसाचाच वापर केला जातो. लिंबूच्या रसाऐवढेच गुणधर्म त्याच्या सालीतही असतात. सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. या सालीचा लेप सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकतो. हा लेप कसा तयार करावा, व त्याचे कोणते उपयोग आहेत जाणून घेवूयात.
असे तयार करा लेप
१. लिंबाच्या केवळ सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. एका कापड्याने त्याठिकाणी हलकेसे बांधा. दोन तासानंतर लेप काढून टाका.
२. एका काचेच्या भांड्यात लिंबूच्या साली घ्या. त्यामध्ये तीन ते चार चमचे ऑलिव्ह ऑईल टाकून भांडे झाकून ठेवा. पंधरा दिवस साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. थोड्याने वेळाने पाण्याने स्वच्छ धुवून काढा.
हे आहेत फायदे
१. यातील व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियममुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
२. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी आहे. वरील उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.