रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विविध पदार्थांमध्ये सुगंधी विलायची वापरली जाते. तसेच विलायची माउथ फ्रेशनर म्हणून सेवन केली जाते. विलायची यासह अनेक फायदे आहेत. विलायची खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्यास त्याचे दुप्पट फायदे होऊ शकतात. छोटी विलायची कफ, खोकला, अस्थमा, मूळव्याध, हृदय आणि गळ्यातील जळजळ दूर करते. हृदय मजबूत बनवते. मळमळ थांबते. रात्री झोपण्यापूर्वी २ विलायची गरम पाण्यासोबत घेतल्याने शरीराला खास फायदे होतात.
दोन विलायची खाऊन एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसेच रक्तही शुद्ध होते. यामुळे तुमची त्वचा चांगली राहते. विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. विलायची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम करते. आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते. पोट बाहेर आले असेल आणि शरीर सडपातळ हवे असल्यास रात्री २ विलायची खाऊन गरम पाणी प्यावे.
यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १, बी ६ आणि व्हिटॅमिन सी असते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. यामधील फायबर आणि कॅल्शियम वजन नियंत्रित करतात. यामुळे विलायची खाऊन गरम पाणी पिण्यास विसरू नका.
रात्री २ विलायची खाऊन पाणी पिल्याने केस मजबूत होतात. केस गळणारही नाहीत आणि काळे होतील. यामुळे केसातील कोंडा निघून जातो. विलायची खाऊन गरम पाणी पिल्याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते. यासाठी हा उपाय रामबाण आहे.