https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

सकारात्मक दृष्टिकोनामुळे वाढते कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 2, 2019
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
positive
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुम्हाला ऐकुण आश्चर्य वाटेल, पण आयआयटी, हार्वर्ड सारख्या ५० संस्थांमध्ये सकारात्मकता शिकवली जाते. सकारत्मकतेवर या ठिकाणी वर्षाला १०० संशोधने होतात. एका संशोधनानुसार सकारात्मक लोकांची कार्यक्षमता ७२ टक्के जास्त असून यशस्वी होण्यासाठी त्यांना ५८ टक्के जास्त संधी मिळतात. आणखी एका संशोधनात ७ ते १० वर्षे वयाच्या मुलांचा मेंदू अभ्यासून निष्कर्ष काढला की, जास्त सकारात्मकतेमुळे गणितातील आकलनक्षमता व ते सोडवण्याच्या क्षमतेत वेगाने विकास होतो. सकारात्मक लोक मनमिळाऊ असतात. कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही त्यांना नेतृत्वाची संधी मिळते.

जगातील ९० देशांकडून हॅपिनेस थेरपीचा वापर केला जातो. ९० पेक्षा जास्त देशांनी हॅपिनेस थेरपी अवलंबली असून यामध्ये रुग्ण आणि नर्स ग्रुप डान्स, विनोद आणि गळाभेट घेऊन सकारात्मकता वाढविली जाते. मेंदूच्या हिम्पोकॅम्पस या भागात सकारात्मकता निर्माण होते. न्यूरॉन्सद्वारे ती संपूर्ण शरीरात पसरते. मेंदूतील न्यूरोकेमिकल डोपामाइन वेगाने सकारात्मकता वाढते. यात बिघाड झाल्यास नकारात्मकता वाढते. आहारात दूध, केळी आणि पोल्टड्ढी प्रॉडक्टने सकारात्मकता वाढते, असे तज्ज्ञ सांगतात.

निसर्गात राहिल्याने आनंद मिळतो. जपानसह अनेक देशांनी फॉरेस्ट बाथिंग सुरू केले आहे. यात जंगलातून फिरवले जाते. यामुळे गुन्हेगारी कमी झाली. संशोधकांच्या मते, १६ ते १८ वर्षे वयात माणूस सर्वाधिक आनंदी असतो. ५० व्या वर्षी ही पातळी कमी होते. आनंदी लोक नातेसंबंधातही विश्वासू असतात. त्यांचे घटस्फोट कमी होतात. सकारात्मक राहिल्यास प्रतिकारशक्ती ५२% वाढते. हृदयविकाराची शक्यता ३९ % कमी होऊन आयुष्य ८ वर्षांनी वाढते. सकारात्मक बातम्या १० मिनिटे वाचल्यास आनंदाच्या पातळीत ६०%वाढ होते.

दररोज ५ ते १० मिनिटे सकारात्मक बातम्या वाचल्यास व त्या शेअर केल्यास माणसात आनंदाची पातळी ६० टक्के वाढते. दिवसभर प्रफुल्लित असल्याचा अनुभव येतो. यामुळेच जगात सकारात्मक बातम्याच सर्वाधिक शेअर केल्या जातात.थ्यू रिकर्ड या जगातील सर्वात आनंदी व्यक्तीने स्वत:वर ४५ वर्षे अभ्यास केल्यानंतर आनंदी राहण्याच्या पाच पद्धती सांगितल्या आहेत. नेहमीच स्वत:विषयी विचार करणे दु:खदायी असते. इतरांची मदत व दान केल्याने आनंद मिळतो.

दर तासाला १० सेकंद हात वर करून शरीराला ताण द्या. स्नायू मोकळे होतात व आनंदाची रसायने सक्रिय होतात. घर किंवा कामाच्या ठिकाणी विनोदी चित्र लावा. ताण आल्यास त्याकडे १ मिनिट पाहा. यामुळे ताण कमी होतो. चॉकलेट आणि अक्रोडमध्ये पॉलीफिनोल्स असतात. यामुळे मेंदूतील सकारात्मकता भाग सक्रिय होतो. निराश वाटल्यास हसायला हवे.

Tags: arogyanamaBodydiseasedoctorEfficiencyexerciseFoodhealthImmune powerMedicineआजारआरोग्यआरोग्यनामाआहारकार्यक्षमताडॉक्टररोगप्रतिकारक शक्तीवजनव्यायामशरीर
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_168b9e73ae0afd819b60016837864cec.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js