आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दारु पिणे हे अतिशय घातक व्यसन आहे. दारुच्या तीस एमएलच्या एका पेगमध्ये १०० कॅलरी असतात. यापेक्षा जास्त दारू प्यायल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे जास्त आणि उपाशीपोटी प्यायल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. दारु प्यायल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम जाणून घेवूयात. दारु पिताच ब्रेनमध्ये डोपामाइन हार्मोन रिलीज होते. डोपामाइनमुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे बीपी वाढते. हार्ट बीट वाढतात. ब्लड मध्ये शुगर लेव्हल कमी होते.
हे आहेत धोके
ब्रेन स्ट्रोक
रोज दारू प्यायल्याने बॉडीचे ब्लड सर्कुलेशन बिघडते. अशावेळी ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
तोंडाचा कँसर
या सवयीमुळे कँसर सेल्स तयार होतात. तोंडाच्या कँसरचा धोका वाढतो.
घशाचा कँसर
दिर्घकाळ दारू प्यायल्याने घशाचा कँसर वाढू शकतो. यामुळे घशात ब्लीडींग होते.
लिव्हर डिसिज
या व्यसनामुळे लिव्हर डॅमेज होते.
हार्ट डिसिज
रोज दारू प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढते. यामुळे हार्ट डिसीजचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाब
अति दारूमुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.