आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वाढती व्यसनाधीनता आणि कामाचा ताण आणि धावपळ यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या वाढत आहे. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांनाच हा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येसाठी अक्रोड हे चांगले काम करते हे एका संशोधनाद्वारे समोर आले आहे. त्यामुळे अक्रोड खाण्याचे फायदे जाणून घ्या.
१) ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे. त्यांनी जर अक्रोड खाल्ले तर त्यांची डिप्रेशनपासून सुटका होऊ शकते.
२) कोणाचं जर आपल्या कामावर लक्ष लागत नसेल तर त्यांनी अक्रोड खा. कारण अक्रोड समरणशक्ती वाढवण्यास मदत करते.
३) जे लोक नियमित अक्रोड खातात. त्यांच्यातील डिप्रेशनचा स्थर २६ टक्क्यांनी कमी आढळतो. त्यामुळे ताणतणाव आणि मानसिक आजारांनी तत्रस्त असाल तर तुम्ही अक्रोड खाऊ शकता.
४) अक्रोड खाल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते. त्यामुळे अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.