आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोकेदुखी, हातदुखी, पायदुखी, स्नायूदुखी अशा किरकोळ दुखण्यावर बहुतांशजण पेनकिलर घेतात. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर गोळी खाणे धोकादायक ठरू शकते. पेनकिलर घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खुप गरजेचे आहे. याविषयी जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
* कधीही पोट रिकामे असेल तर पेनकिलर घेऊ नका.
* पेन किलर घेतल्यावर भरपूर पाणी प्यावे.
* सतत पेनकिलर गोळ्या घेतल्याने सवय लागू शकते.
* दारू आणि पेनकिलर एकत्र घेणे धोकादायक आहे.
* गोळ्यांच्या दुष्परिणामंविषयी डॉक्टरांकडून अगोदरच माहिती घ्या.
* दोन दिवसांपेक्षा जास्त काळ दुखणे सुरू असेल तर डॉक्टरांकडे जा.