• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

दिवसभर एसीमध्ये बसताय, सावधान… हि समस्या उदभवू शकते

by Dnyaneshwar Phad
May 27, 2019
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
ac-body-pain
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- अनेकजण कार्यालयात दिवसभर एसीमध्येच काम करतात. शिवाय घरी आल्यानंतरही एसीमध्येच राहतात. कारमध्ये एअर कंडिशन असते. सतत एसीमध्ये बसल्याने उष्णतेपासून बचाव आणि आराम मिळवू शकतो, मात्र, आरोग्यासंबंधी अशा कित्येक समस्या आहेत ज्या एसीमुळे होऊ शकतात. यासाठी प्रत्येकाने काही काळ सामान्य तापमानात राहिले पाहिजे. ज्यामुळे आरोग्यही चांगले राहते.

याबाबत अलबामा युनिव्हर्सिटीत एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की एअर कंडिशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो. गारवा असलेल्या ठिकाणी शरीरातील ऊर्जा खर्च होत नसल्याने शरीरातील चरबी वाढते. यासाठी एकाच जागेवर जास्त वेळ बसू नये. लो फॅटचा आहार घ्यावा. एअर कंडिशनचा फिल्टर अस्वच्छ असेल तर दम्याचा त्रासही होऊ शकतो. तसेच घशात खवखव आणि सर्दी-खोकल्याची समस्या होऊ लागते. कित्येक लोकांना सारखा खोकलाही होतो. यासाठी एअर कंडिशनरच्या फिल्टरची सर्विसिंग वेळच्यावेळी केली पाहिजे. गारव्याचा सरळ परिणाम शरीराच्या सांध्यांवर होऊन गुडघे, हात आणि मानेत दुखते आणि सांधे आखडतात. सतत याच अवस्थेत राहिल्यामुळे आर्थरायटिससारखा गंभीर आजारही होऊ शकतो. यासाठी एकाच जागी जास्त वेळ बसू नये.एकाच जागी बसल्याने दुखणे वाढू शकते.

सतत एअर कंडिशनमध्ये बसल्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे स्नायूमधील दुखणे वाढण्याची शक्यता असते. वय वाढल्यानंतर ही समस्या गंभीर होऊ शकते. यासाठी एसीचे तापमान खूप कमी ठेवू नये. एअर कंडिशनरमध्ये राहिल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो तसेच डोळ्यात पाणी, जळजळ आणि खाजदेखील होते. अशावेळी दिवसभरात जास्तीत जास्त वेळा डोळे धुवावे. पापण्यांची सारखी उघडझाप करावी. एसी सुरू असल्यास हवेतील आर्द्रता कमी होते आणि याचे दुष्परिणाम त्वचेवर दिसून येतात. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक कोमलता संपवते आणि त्वचा कोरडी होते. ही समस्या टाळण्यासाठी पाणी जास्त प्यावे.

Tags: ACair conditionerarogyanamaobesityproblemsआरोग्यनामालठ्ठपणासमस्या
Dry Eyes
माझं आराेग्य

Dry Eyes Syndrome : ओळखा ‘ड्राय आय सिंड्रोम’ची लक्षणे आणि जाणून घ्या या पासून बचाव करण्याचे उपाय

November 5, 2020
Mushrooms
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

दररोज ‘हे’ सेवन केल्यास वजन होते कमी, अस्थमा होतो बरा

July 7, 2019
Rice
Food

Rice For Weight loss: अशाप्रकारे शिजवा तांदूळ, तर कमी होतील कॅलरी !

November 13, 2020
‘इविंग सारकोमा’ नेमकं काय आहे ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !
माझं आराेग्य

‘इविंग सारकोमा’ नेमकं काय आहे ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

September 10, 2020

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

1 day ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.