आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला कोणतीही गोष्ट विशिष्ट प्रमाणातच हवी असते. हे प्रमाण कमी अथवा जास्त झाल्यास त्याचे शरीरावर परिणाम दिसून येतात. पाणी, अन्न, साखर, मिठ अश अनेक पदार्थ योग्य प्रमाणातच सेवन करावे लागतात. यासाठी योग्य ती खबरदारी बाळगावी लागते. मिठामधील सोडियमची शरीराला आवश्यकता असते. मात्र शरीरात प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. वयोमानानुसार दिवसभरात मीठ आणि साखर किती खावी, याची माहिती घेवूयात.
दिवसभरात मीठ किती खावे
* १ ते ३ वर्षांपर्यंतची मुले – २.५ ग्रॅम (सोडियम – १००० एमजी)
* ४ ते ८ वर्षांपर्यंतची मुले – ३ ग्रॅम (सोडियम – १२०० एमजी)
* ९ ते ५० वर्षे वय – ३.७५ ग्रॅम (सोडियम – १५०० एमजी)
* ५१ ते ७० वर्षे वय – ३.२५ ग्रॅम (सोडियम – १३०० एमजी)
* ७० वर्षांहून अधिक वय – ३ ग्रॅम (सोडियम – १२०० एमजी)
दिवसभरात किती साखर खावी
* २ वर्षांहून लहान मुलांनी साखर अजिबात खाऊ नये.
* २ ते १८ वर्षांपर्यंत – ६ चमचे साखर (२५ ग्रॅम)
* १८ पेक्षा जास्त वयाचे पुरूष – (३८ ग्रॅम)
* १८ पेक्षा जास्त वयाच्या महिला – (२५ ग्रॅम)