आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्लिम आणि फिट राहण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. परंतु, काही चुका झाल्यास या प्रयत्नांना यश येत नाही. दुपारच्या जेवणानंतर काही चुकीच्या सवयींमुळे वजन वाढते. या सवयी टाळल्या तर वजन कमी करता येणे सोपे आहे. या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात.
या सवयी टाळा
१. कूकीज, चॉकलेट सारखे गोड पदार्थ शक्यतो टाळाच. खूप भूक लागल्याशिवाय असे पदार्थ खाऊ नका.
२. जेवल्यानंतर लगेचच कॉफी घेऊ नका. कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात.
३. दुपारी ३ नंतर जेवण घेऊ नका. कारण यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रीयेत अडथळे येऊन वजन कमी होत नाही.
४. दुपारच्या जेवल्यानंतर झोपू नका. तसेच एकाच ठिकाण बसून राहू नका. यामुळेही वजन वाढते.
५. दुपारच्या जेवणानंतर गोड खाल्ले तर वजन वाढू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणे टाळा.