आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फिटनेस टिकविण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. जिमबरोबर योग्य डायट प्लॅन घेतल्यास आरोग्य चांगले राहते. कारण फक्त जिममध्ये मेहनत घेऊन फारसा फरक पडत नाही. पौष्टिक आहाराचीही भूमिका महत्त्वाची असते. काही तज्ज्ञ जिमनंतर काही हेल्दी ड्रिंक्स घेण्यास सांगतात. यामुळे चांगला फायदा होतो. जिमनंतर कोणती ड्रिंक्स घ्यावीत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ही ड्रिंक्स घ्या
१. मॅपल सिरप
यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. साखरेचे प्रमाणही वाढत नाही. यात सोडियम असल्याने उच्च रक्तदाबाची समस्या असणारांनी हे सिरप घेऊ नये.
२. बनाना ड्रिंक, तृणरस
बनाना ड्रिंक तसेच गव्हाचा तृणरस फेटून एकत्र करुन घ्यावा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
३. संत्री, गाजर ज्यूस
संत्री व गाजराच्या ज्यूस यामध्ये विटॅमिन सी व ई भरपूर उर्जा मिळते. दिवसभर फ्रेश वाटते.
४ चॉकलेट ड्रिंक
जिममधून आल्यानंतर हे घेतल्यास त्यातील कॅफिनचा सकारात्मक फायदा होतो.