आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांच्या मेंदूवर वयाचा कमी प्रभाव पडतो, असे अमेरिकेच्या कोलंबसमध्ये ओहियो स्टेट युनिवर्सिटीच्या न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूटमधील मुख्य संशोधक एलिझाबेथ किर्बी यांनी यासंबंधीच्या संशोधनानंतर म्हटले आहे. यासाठी भरपूर मित्र हवेत. सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते, असे या संशोधकांनी म्हटले आहे.
हे लक्षात ठेवा
१ भावना आणि प्रेरणा यांना जागृत करणारा मेंदूचा भाग वयासोबत प्रभावित होतो. मेंदूच्या या भागांमध्ये त्यांचे सामाजिक संबंध सुरक्षित राहतात.
२ समूहाने राहिल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, असे संशोधकांना या प्रयोगात आढळून आले. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला.
Visit : arogyanama.com