ज्वारीची भाकरी ‘या’ आजारांवर ठेवते नियंत्रण

jwari
June 29, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काहींना भाकरी खाण्यापेक्षा चपाती खायला खूप आवडते. भाकरी म्हंटल की अनेक जण तोंड वाकड करतात. परंतु, आपल्याला आपलं आरोग्य किंवा काही आजारांना नियंत्रित ठेवायचं असेल तर ज्वारीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला जरी चपाती आवडत असेल तरीही तुमच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करणे आवश्यक आहे.

ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

१) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. त्यामुळे पोटांचे विकार होत नाहीत.

२) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते. त्यामुळे आजारी असणाऱ्यांना डॉक्टर ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात.

३) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

४) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे हृदयाच्या समस्या असणाऱ्यांनी बाजरीची भाकरी खावी.

५) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

६) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

७) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

८) ज्वारीतील काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

९) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास ज्वारी उपयुक्त आहे.